शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळ जाहीर करण्यास शेतकऱ्यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 22:18 IST

देशातील पहिलीच घटना : कृषिभूषण शेतकऱ्यांचे लोकप्रतिनिधींसह प्रशासनाला दिले निवेदन

धुळे : जिल्ह्यातील शेतकºयांनी दुष्काळ जाहीर करण्यास विरोध केला आहे़ आणेवारी वाढवून शेतकºयांना पिक विम्याची भरघोस रक्कम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी कृषिभूषण शेतकºयांनी केली आहे़दुष्काळ जाहीर करण्यास विरोध दर्शविण्यासाठी शेतकºयांनी आंदोलन केल्याची ही देशातील कदाचित पहिलीच घटना असावी, अशी प्रतिक्रिया प्रकाश पाटील यांनी दिली़निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान पिक विमा योजना अतिशय चांगली आहे. धुळे जिल्ह्यातील शेतकºयांसाठी मात्र ही योजना नुकसानकारक ठरत आहे़ दुष्काळ दाखवुन दुष्काळी मदत मिळण्यासाठी गाव पातळीपासून ते जिल्हा स्तरावरील सर्वपक्षीय राजकीय नेतृत्व शासन, प्रशासनावर दबाव टाकताना दिसते. स्थानिक तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक देखील शेतकºयांना फायदा व्हावा म्हणुन दुष्काळ जाहीर होण्याच्या उद्देशाने हेतुपुरस्सर पिक कापणी प्रयोगाची आकडेवारी आहे त्यापेक्षा अतिशय कमी दाखविण्याचा प्रयत्न करतात़ यामुळे पिक विमा योजनेतील उंबरठा उत्पादन म्हणजेच मागिल पाच वषार्ची सरासरी प्रशासनाच्या दफ्तरी अत्यंत कमी दिसते़ बेटावद महसुल मंडळाचे कापसाचे उंबरठा उत्पादन प्रति हेक्टरी ४.७५ क्विंटल आहे. यापेक्षा कमी उत्पादन आले तरच व तेवढीच नुकसान भरपाई मंजुर होईल. या कारणांमुळे धुळे जिल्हा वास्तव पिक विमा नुकसान भरपाई पासुन वंचित झालेला आहे.यंदाचा आतापर्यंतचा हंगाम चांगला आहे. त्यामुळे यावर्षी नुकसान भरपाई मंजुर होण्याची शक्यता कमी आहे. भविष्यात चांगली नुकसान भरपाई हवी असेल तर उंबरठा उत्पादन वाढविणे गरजेचे आहे. उंबरठा उत्पादन वाढविण्यासाठी दुष्काळ न दाखविता १०० पैसे पर्यंत आणेवारी दाखविणे महत्त्वाचे आहे.त्यामुळे दुष्काळ जाहिर न करता आणेवारी वाढवून शेतकºयांना पिक विम्याची भरघोस नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी पढावद अ‍ॅड़ प्रकाश भुता पाटील, वडणे येथील दिलिप पाटील, धुळ्याचे प्रभाकर चौधरी, सुधाकर बेंद्रे, मुकटीचे सुदीप पाटील, साक्रीचे ललित देवरे, शिरपूरचे जनार्दन पाटील, अरुण पाटील या कृषिभूषण शेतकºयांसह आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष ईश्वर पाटील सोनगीर आदींनी केली आहे़याबाबत खासदार डॉ़ सुभाष भामरे, आमदार मंजुळा गावीत, जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिरूदेचे अध्यक्ष तुषार रंधे, उपाध्यक्ष कामराज, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती बापु खलाणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी पी़ एम़ सोनवणे आदींना निवेदन देण्यात आले़दुष्काळ जाहीर करण्यास शेतकºयांनी पहिल्यांदाच विरोध केला़

टॅग्स :Dhuleधुळे