शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समिती व्यापाऱ्यांच्या वादात शेतकरी वेठीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:33 IST

पिंपळनेर उपबाजार समिती कांदा लिलावासाठी जिल्ह्यासह खान्देशात प्रसिद्ध आहे. दरवर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच कांदा खरेदीचा लिलाव सुरू होतो. मात्र, ...

पिंपळनेर उपबाजार समिती कांदा लिलावासाठी जिल्ह्यासह खान्देशात प्रसिद्ध आहे. दरवर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच कांदा खरेदीचा लिलाव सुरू होतो. मात्र, यावर्षी एप्रिल महिना अर्धा उलटला तरी अद्याप लिलाव प्रक्रिया सुरू झालेली आहे. येथे लिलाव प्रक्रिया सुरू होत नसल्याने, काही शेतकरी नाशिक येथे कांदा विक्रीसाठी नेत आहेत.

लिलाव प्रक्रिया सुरू करण्यासाठी बाजार समितीने व्यापाऱ्यांकडे कागदपत्रांची मागणी केलेली आहे. मात्र, व्यापारी कागदपत्रे देत नसल्याने, लिलाव प्रक्रिया रखडलेली आहे. यापूर्वी एक दोन व्यापाऱ्यांनी बाजार समितीला कुठलेही कागदपत्र सादर केले नाही. त्या व्यापाऱ्यांनी ४० ते ४५ शेतकऱ्यांचे पैसे दिलेच नाहीत. संबंधित व्यापाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलने करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. भविष्यात पुन्हा अशी परिस्थिती येऊ नये, यासाठीच खबरदारी म्हणून बाजार समितीने व्यापाऱ्यांकडे काही लायसन्स कागदपत्र, बँक गॅरंटी व रोखीने खरेदी आदी विषय मांडले आहेत. जानेवारीत नोटीस देऊन, तोंडी सूचना, तसेच अंतिम नोटीस देऊन तीन महिने होऊनदेखील एकाही व्यापाऱ्याने कागदपत्र बाजार समितीकडे सादर केलेली नाहीत.

आता शेतकऱ्यांचा कांदा शेतातून काढला जात असता ऐन कांदा विक्री वेळी उपबाजार समिती बंद आहे. शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकडे कोणाचेच लक्ष नाही. तर व्यापारी खासगी खरेदी गोडाऊनवर करीत आहे. येथे शेतकऱ्यांना भाव कमी मिळत असल्याचा आरोप कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संजय भदाणे यांनी केला आहे. कोरोना व लॉकडाऊनमुळे शेतकरी अधिक अडचणीत आला असता आता बाजार समिती बंद असल्याने अनेक शेतकरी बाजार समिती सुरू होण्याची वाट पाहात आहेत. अनेक शेतकऱ्यांकडे कांदा चाळ नसल्याने या शेतकऱ्यांची कांदा साठवण्यासाठी दमछाक होत आहे.

कोरोनाची महाभयानक परिस्थिती असता नागरिकांकडे पैशांची चणचण भासत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी, बाजार समिती व व्यापारी यांच्या अंतर्गत वादात शेतकरी पिळला जात आहे. बाजार समिती बंद आहे. मात्र, एकाही शेतकरी संघटनेचे या प्रश्नाकडे लक्ष नाही, हे विशेष! संचालक मंडळ हा प्रश्न सोडवणार का? हा प्रश्न त्वरित सोडवून लिलाव प्रक्रिया सुरू करण्याची मागणी होत आहे.

व्यापाऱ्यांकडून ४५ लाख रुपयांपर्यंत थकबाकी वसूल होणे बाकी आहे. ती व्यापाऱ्यांनी त्वरित भरावी. थकबाकी वसूल होत नसल्याने १२ महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचा पगार नाही. कोरोनात ५ कर्मचारी कोविड पॉझिटिव्ह असल्याने उपचारासाठी पैसे नाहीत, असे कर्मचारी सांगतात.