शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शहरात सर्वत्र सामसुम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 12:48 IST

शिरपूर : नागरिकांनी घरीच थांबणे पसंत केले, बाजारपेठेतही होता शुकशुकाट

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यााठी प्रशासनाकडून गर्दीच्या ठिकाणांवर निर्बंध घालण्यात आले असतांना रविवारी जनतेने स्वयंस्फुर्त कर्फ्यू लावून घेतल्यामुळे रविवार सुटीचा दिवस असूनही सुनेसुने वाटले़ शिरपूरच्या इतिहासात प्रथमच १०० टक्के कडकडीत बंद होते़ सर्वच व्यावसायिक दुकाने, हॉटेल्स, चित्रपट गृहे, प्रवाशी नसल्यामुळे बससेवा बंद असल्यामुळे शिरपूरकरांनी रविवारी घरी राहणेच पसंत केले़ जीवनाश्यक वस्तु, किराणा दुकाने, मेडिकल आदींनी देखील बंद पाळला़शाळांना सुट्टया देण्यात आल्या असल्यातरी मुलांच्या गर्दीच्या ठिकाणी घेवून जावू नये, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्याने पालकांनीही मुलांना बाहेर आणणे टाळले़ बंदच्या आदेशामुळे बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला तर दैनंदिन आर्थिक व्यवहारांवरही परिणाम झाल्याचे दिसून आले़ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला शिरपूरकरांनी १०० टक्के साथ दिली़ रविवारी जनतेने स्वयंस्फुर्त कर्फ्यू लावून घेतल्यामुळे रविवार सुटीचा दिवस असूनही शुकशुकाट वाटला़२२ रोजी सकाळी प्रांताधिकारी डॉ़विक्रम बांदल यांनी शहराचा फेरफटका मारून शहरवासियांनी उत्स्फुर्तपणे जनता कर्फ्यूला साथ दिल्यामुळे समाधान व्यक्त केले़ डीवायएसपी अनिल माने व पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त चौक होता़ तहसिलदार आबा महाजन, नगरपालिका मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी शहरात फिरून या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शहरात ठिकठिकाणी फवारणी होत असलेल्या भागाची पहाणी केली़कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंध कायद्यानुसार सुरू असलेल्या उपाय योजनेनुसार आरोग्य विभागाने गर्दी होणार नाही यावर लक्ष केंद्रीत केले आहे़ त्यानुसार ग्राहकांची गर्दी होत असलेल्या मॉल्स, चित्रपटगृहे, शाळा-महाविद्यालये हे ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून आठवडे बाजार देखील बंद करण्यात आला आहे़ गर्दीच्या ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अधिक व जलद गतीने होण्याची भीती असल्याने गर्दी नियंत्रण करण्यावर प्रशासनाकडून निर्बंध घालण्यात आले आहेत़ दरम्यान येथील बालाजी मंदिर २३ व २४ मार्च रोजी बंद ठेवण्यात येणार आहे.बोराडी येथे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून रविवारी बोराडी गावातील सर्व दुकान, हॉटेल, किराणा दुकान, अभ्यासिका, इतर व्यवहार, अन्य समारंभ, कम्युनिटी सेंटर, बिअरबार, उद्यान, आदीनी जनता कर्फ्यूमध्ये १०० टक्के सहभागी झालेत़ उपसरपंच राहुल रंधे यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी गावातील किर्तन सप्ताह कार्यक्रम रद्द करण्यात आला़ बाहेर गावाहून आलेल्या पाहुण्यांची नोंद प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात येत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे