शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

एमपीएससी परीक्षा देण्यालाही आता ६-९ संधीचे बंधन, विद्यार्थ्यांच्या संमिश्र प्रतिक्रीया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 12:06 IST

धुळे : एमपीएसची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोगाने आता परीक्षा देण्याची कमाल मर्यादा निश्चित केली आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जास्तीत ...

धुळे : एमपीएसची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोगाने आता परीक्षा देण्याची कमाल मर्यादा निश्चित केली आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ६ वेळा तर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ९ वेळा परीक्षा देता येणार आहे. आयोगाच्या या निर्णयानंतर जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही विद्यार्थ्यांनी आयोगाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर काहींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वी कितीही वेळा परीक्षा देता येत होती. आता मात्र त्यावर बंधने येणार आहेत. या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील हवशा नवश्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होईल असे काही विद्यार्थ्यांनी निर्णयाचे स्वागत करताना सांगितले. तर यामुळे परीक्षा देण्याच्या कमी संधी मिळणार असल्याने काही विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आयोगाने परीक्षा प्रक्रिया वेळेत पार पाडावी असेही विद्यार्थ्यांनी सांगितले.अशाप्रकारे होईल संधीची गणनाएखाद्याने एमपीएससीच्या पूर्व परीक्षेत भाग घेतल्यास ही संबंधित परीक्षेची संधी समजली जाईल. एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एक पेपरसाठी उपस्थित राहिल्यास त्याची ती संधी समजली जाईल. परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवार कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास ती परीक्षेची उपस्थिती समजली जाईल.परीक्षा प्रक्रिया वेळेत पूर्ण करावीआयोगाच्या निर्णयाचे स्वागत करतो. यामुळे हौस म्हणून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी होईल. आयोगाकडून परीक्षार्थीना संधींची मर्यादा निश्चित करण्यात येत आहे, मात्र आयोगानेही परीक्षा प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, अशी आमची अपेक्षा आहे.पियुष शिंदे, विद्यार्थी, धुळे