बसच्या धडकेत वृध्द जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 22:57 IST2019-11-28T22:56:56+5:302019-11-28T22:57:14+5:30

साक्री रोड परिसर : दुपारचा चहा घेऊन घरी परतत असताना घडली दुर्घटना

The elderly were killed in a bus accident | बसच्या धडकेत वृध्द जागीच ठार

बसच्या धडकेत वृध्द जागीच ठार

धुळे : साक्रीकडून शहरात भरधाव वेगाने येणाºया गुजरात राज्याच्या बसने वृध्दाला जोरदार धडक दिली़ अपघाताची ही घटना साक्री रोडवरील मच्छिबाजार भागात दुपारी घडली़ या अपघातात वृध्दाला डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू ओढवला़ ते दुपारचा चहा पिण्यासाठी आल्याने घराकडे जात असताना ही दुर्घटना घडली़ या अपघातामुळे वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजले असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे़ 
साक्री रोड भागातील शनिनगरात राहणारे गिरजाआप्पा वेडू वाडेकर (७०) यांचा अपघातात मृत्यू झाला आहे़ गिरजाआप्पा यांनी आपल्या कार्यकाळात हमाली आणि दुध-दहीचा व्यवसाय करुन आपल्या परिवाराचा चरितार्थ भागविला़ अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून त्यांनी आपल्या चार मुलांना घडविले़ यात लहानपणीच एका मुलाचा मृत्यू झाल्याने ते खचले होते़ पण, त्यातूनही त्यांनी स्वत:ला सावरत खंबीरपणे उभे राहिले़ हमालीचे काम त्यांनी सोडले नाही़ हमालीसोबतच त्यांनी दूध दही सुध्दा विकण्याचे सोडले नाही़ त्यांची पत्नी त्यांच्या पाठीशी असल्याने त्यांच्या तीन मुलांना त्यांनी शिकविले आणि वाढविले़ यातील एक मुलगा किरणा दुकानात काम करतो तर उर्वरीत दोन मुले ही दूध डेअरीवर काम करतात़ 
चहा ठरला शेवटचा
दररोज दुपारच्यावेळेस गिरजाआप्पा वाडेकर साक्री रोडवरील हॉटेलवर चहा पिण्यासाठी यायचे़ या भागात त्यांचा मित्र परिवार आहे़ गप्पाटप्पा केल्यावर चहाचा आस्वाद घेतल्यावर ते घराकडे परतत यायचे़ ते सहसा साक्री रोडवरच फिरायचे़ गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घराकडे परतत होते़ त्याचवेळेस गुजरात राज्याची जीजे १८ झेड ५०६५ क्रमांकाची बस साक्रीकडून धुळ्याकडे येत होती़ मच्छिबाजार परिसरात बसची धडक वृध्दाला बसली आणि गिरजाआप्पा यांना जबर दुखापत झाली़ 
घटनास्थळी पोलीस दाखल
साक्री रोड भागात एसटी बसने वृध्दाला जोरदार धडक दिल्याने घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा झाली होती़ अपघाताची माहिती मिळताच धुळे शहर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाºयांनी धाव घेतली़ ही बस शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आली असून अपघाताची नोंद करण्यात आली़ २९ रोजी सकाळी ११ वाजता अंत्ययात्रा निघणार आहे़ 
अपघाताची मालिकाच
साक्री रोडवर होणारे सातत्याने अपघात रोखण्यासाठी रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले़ रस्त्यात दुभाजक देखील टाकण्यात आले़ तरी देखील रस्ता रुंद होण्याऐवजी अरुंद असल्याचे स्पष्ट आहे़ या रस्त्यावर लहान-मोठ्या वाहनांची वर्दळ सतत सुरु असते़ याच रस्त्यावर शाळकरी मुलीने देखील आपले प्राण गमाविले आहे़ या अनुषंगाने वाहतूक व्यवस्था सुधारेल, अशी अपेक्षा असताना मात्र परिस्थितीत काहीही फरक पडला नसल्याचे समोर येत आहे़ 

Web Title: The elderly were killed in a bus accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.