शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मालपूर परिसरात पावसाच्या भीतीने लवकर भुईमूग काढणीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:37 IST

मालपूरसह परिसरात गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारी तीन वाजेनंतर अवकाळी पावसाचे वातावरण निर्माण होऊन तयार भुईमूग पीक उत्पादक ...

मालपूरसह परिसरात गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारी तीन वाजेनंतर अवकाळी पावसाचे वातावरण निर्माण होऊन तयार भुईमूग पीक उत्पादक शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. या आधी रविवारी अवकाळी पावसाने हजेरी लावून नुकसान केले होते. यामुळे हातातोंडाशी आलेला घास पाण्यात जाऊन मातीत मिसळून सर्वच उत्पन्न वाया जाईल, तसेच पशुंचा चाराही मातीमोल होईल, या धास्तीनेच येथे आधुनिक यंत्राला पसंती दिली आहे.

भुईमूग हे पीक रब्बी व खरीप दोन्ही हंगामांत येथील शेतकरी घेतात. यातून मिळणाऱ्या चाऱ्याला मोठी मागणी असते, परंतु या यंत्रामुळे चारा काही अंशी वाया जातो. मात्र, यासाठी लागत असलेली मजुरी बघता, हे यंत्र फायद्याचे असल्याचे येथील शेतकरी सांगतात. भुईमूग काढणीसाठी मजुरी गगनाला भिडली असून, अर्धा पारगाची एका माणसाची मजुरी ३५० रुपये असल्याचे सांगितले जात आहे, तर एकराला ४० माणसे लागत असून, यामुळे मजुरी वजा करता, हातात काहीच शिल्लक राहत नसल्यामुळे या यंत्राला पसंती दिली असून, मात्र हे यंत्र अजून विकसित होणे गरजेचे आहे. मालपूर येथील आनंदराव खलाणे यांनी हे यंत्र चालू वर्षी गुजरात राज्यातील राजकोट येथून आणले असून, शेतकऱ्यांनी या यंत्राला पसंती दिली आहे. यामुळे वेळ व मजुरीचा खर्च वाचत असल्याचे शेतकरी बापू रामचंद्र पाटील यांनी सांगितले. भुईमुगाच्या शेंगा या जमिनीच्या खाली वाढीस लागत असल्यामुळे त्यांना मातीतून वेगळ्या करणे हे खूपच कष्टाचे काम असून, त्यात मे महिन्याचे ऊन अंगावर घ्यावे लागत असल्यामुळे अधिकच जोखीम वाढते.