शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात पहाटे कंटेनरसह २९ लाखांचा गुटखा पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 12:48 IST

गुजरात राज्यात जात होता गुटखा : पोलिसांनी कंटनेर चालकास केली अटक, गुन्हा दाखल

आॅनलाइन लोकमतधुळे : हैद्राबादहून अहमदाबादकडे नेण्यात येणारा १७ लाखांचा गुटखा, पानमसाला व १२ लाखांचा कंटेनर असा एकूण २९ लाखांचा ऐवज धुळे तालुका पोलिसांनी पकडला. ही कारवाई पोलिसांनी २५ रोजी मध्यरात्रीनंतर पहाटे १ वाजेच्या सुमारास चाळीसगाव-धुळे राष्टÑीय महामार्ग क्र.२११ वरील शिरूड चौफुलीजवळ केली. याप्रकरणी कंटेनर चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.हैद्राबाद येथुन चाळीसगाव मार्गे अहमदाबादला कंटेनरमधून (क्र. केअ‍े ०१-अ‍ेएफ २३९२) मधून गुटखा, पानमसाला नेला जात असल्याची माहिती धुळे तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने धुळे-चाळीसगाव रोडवरील शिरूड चौफुलीजवळ नाकाबंदी केली. २५ डिसेंबर रोजी पहाटे १ वाजेच्या सुमारास पोलिसांनी संशयित कंटेनर अडवून चालकाकडे चौकशी केली असता, त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांना संशय आला. त्यांनी कंटेनरचा मागील दरवाजा उघडला असता, त्यात प्लॅस्टिक पोत्यांमध्ये पान मसाल्याचा अवैध गुटखा आढळून आला.पोलिसांनी ६१ पोत्यांमधून १६ लाख ४७ हजार रूपये किंमतीचे १३ हजार ४२० गुटख्याची पाकिटे, त्याचबरोबर सहा पोत्यांमधून ४८ हजार रूपये किंमतीचा पान मसाला व १२ लाख रूपये किंमतीचा कंटनेर असा एकूण २८ लाख ९५ हजार रूपयांचा माल जप्त केला.ही कारवाई पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक राजू भुजबळ, साक्रीचे उपविभागीय अधिकारी श्रीकांत घुमरे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे, उपनिरीक्षक कैलास चौधरी, पोलीस नाईक हेमंत बोरसे, कॉन्स्टेबल अमोल कापसे, सुरेश पावरा, राकेश शिरसाठ, सुमीत चव्हाण यांच्या पथकाने केली.याप्रकरणी धुळे तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी कंटेनर चालक अब्दुल्लाह अबु कलाम (वय ३१, रा. रानीपूर, उत्तरप्रदेश) याला ताब्यात घेतलेले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे