डॉ. मनोज महाजन यांची फेलोशिपसाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:38 IST2021-04-23T04:38:25+5:302021-04-23T04:38:25+5:30

शिंदखेडा : जागतिक आरोग्य संघटनेच्या आंतरराष्ट्रीय कर्करोग संशोधन फेलोशिपसाठी शिंदखेडा येथील डाॅ. मनोज महाजन यांची निवड करण्यात आली ...

Dr. Selection of Manoj Mahajan for Fellowship | डॉ. मनोज महाजन यांची फेलोशिपसाठी निवड

डॉ. मनोज महाजन यांची फेलोशिपसाठी निवड

शिंदखेडा : जागतिक आरोग्य संघटनेच्या आंतरराष्ट्रीय कर्करोग संशोधन फेलोशिपसाठी शिंदखेडा येथील डाॅ. मनोज महाजन यांची निवड करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या समितीने ही निवड केली आहे. डाॅ. महाजन हे दिनांक ३१ मे ते ९ जुलै २०२१ दरम्यान लियाॅन (फ्रान्स) येथे होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या फेलोशिपसाठी जगातील सुमारे ४०० ते ५०० डाॅक्टरांनी अर्ज केले होते. त्यातून केवळ १५ ते २० जणांची फेलोशिपसाठी निवड केली जाते. यावर्षी भारतातून डाॅ. मनोज महाजन यांची निवड झाली आहे. ते सध्या उदयपूर (राजस्थान) येथील पॅसिफिक मेडिकल काॅलेज हाॅस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. डाॅ. महाजन हे शिंदखेड्याचे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक उमेशचंद्र दौलतराव महाजन व पद्मावती महाजन यांचे चिरंजीव आहेत.

Web Title: Dr. Selection of Manoj Mahajan for Fellowship