दोंडाईतील IPL च्या सट्टयांचा डाव उधळला, माजी नगरसेवकांसह दोघे ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 20:06 IST2023-04-17T20:05:00+5:302023-04-17T20:06:00+5:30
माजी नगरसेवक नंदू गुलाबसिंग सोनवणे यांच्यासह संभाजी पाटील व अतुल पाटील यांना अटक करण्यात आली आहे.

दोंडाईतील IPL च्या सट्टयांचा डाव उधळला, माजी नगरसेवकांसह दोघे ताब्यात
राजेंद्र शर्मा
धुळे – आय.पी.एल. च्या मॅचेच दरम्यान दोंडाईचासह परीसरातील मुलांना मोबाईल वरून सटटा घेतांना हॉटेल गोपाल मधील रूम नंबर 201 मध्ये पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाने धाड टाकून त्यांचा डाव उधळला असून याठिकाणी जवळपास 91 हजाराच्या मुददेमालसह माजी नगरसेवक नंदू गुलाबसिंग सोनवणे यांच्यासह संभाजी पाटील व अतुल पाटील यांना अटक करण्यात आली आहे.
दोंडाईचा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार त्यांनी सपोनि दिनेश मोरे, पोलिस उपनिरीक्षक शरद लेंडे यांच्यासह कर्मचा-यांना घेवून हॉटेल गोपाल मध्ये धाड टाकली त्यावेळी तिथे मुंबई इंडीयन्स आणि कोलकाता नाईड राईडर्स या दोन संघादरम्यान खेळल्या जाणा-या 20-20 आय.पी.एल. किक्रेट सामन्यावर सटटा खेळणा-या लोकांना मोबाईल फोनव्दारे माहिती घेवून व देवून सबंधीत लोकांकडून स्वत:च्या फायदयाकरीता जुगार खेळतांना तसेच सदर माहिती एका पांढ-या रंगाच्या चिठठीवर नोंद करत असतांना जुगाराचे साहित्य साधनासह अंदाजे 91,010 रूपये किमतीचा मुददेमाल जप्त केला. त्यांचे विरूध्द मुंबई जुगार प्रतिबंध अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.स.ई. दिनेश मोरे तपास करीत आहेत.