विखरण आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स, परिचारिकांचा कोरोनायोध्दा म्हणून सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:36 IST2021-05-23T04:36:01+5:302021-05-23T04:36:01+5:30

यावेळी वैद्यकीय अधिकारी , आरोग्य साहाय्यक, परिचारिका, परिचर, वाहनचालक, आरोग्य सेवक असे एकूण ३६ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कोरोनायोध्दा ...

Doctors and nurses at Vikhran Health Center felicitated as Coronary Warriors | विखरण आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स, परिचारिकांचा कोरोनायोध्दा म्हणून सत्कार

विखरण आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स, परिचारिकांचा कोरोनायोध्दा म्हणून सत्कार

यावेळी वैद्यकीय अधिकारी , आरोग्य साहाय्यक, परिचारिका, परिचर, वाहनचालक, आरोग्य सेवक असे एकूण ३६ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कोरोनायोध्दा म्हणून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष अशोक महाजन होते. यावेळी प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसन्न कुलकर्णी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागुल उपस्थित होते. मराठा पाटील बहुद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष भामरे, अध्यक्ष रावसाहेब चव्हाण व सुनील धनगर, प्रा. दिलवरसिंग गिरासे, संतोष पाटील, आरोग्य साहाय्यक प्रकाश वाघ यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर. एस. चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन एस. एन. पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन आरोग्य साहाय्यक प्रकाश वाघ यांनी केले.

(फोटो :- प्राथमिक आरोग्य केंद्र विखरण येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कोरोनायोध्दा म्हणून सत्कार करण्यात आला. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसन्न कुलकर्णी, डॉ. राजेंद्र बागुल, अशोक महाजन आदी.)

Web Title: Doctors and nurses at Vikhran Health Center felicitated as Coronary Warriors