शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

डाॅक्टर, लसीकरणानंतर किती दिवस मद्यपान करायचे नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:37 IST

धुळे : कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर मद्यपान करावे की करू नये असे प्रश्न मद्य शाैकिनांकडून उपस्थित केले जात आहेत. ...

धुळे : कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर मद्यपान करावे की करू नये असे प्रश्न मद्य शाैकिनांकडून उपस्थित केले जात आहेत. गप्पांमध्ये हा विषय रंगतोय. पण सामाजिक धाकाने कुणीही जाहीरपणे विचारायला धजावत नसल्याचे चित्र आहे. परंतु, लसीकरण आणि मद्यपानाचा काही संबंध नाही. ज्यांना मद्यपान करायचे ते करू शकतात. परंतु लसीकरणानंतर मद्यपान किंवा त्याचे अतिसेवन टाळणे योग्यच होईल, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. लसीकरणासाठी नागरिक गर्दी करीत आहेत. मात्र, काही मद्य शाैकीन शंका उपस्थित करीत आहेत. याबाबत थेट विचारणाही होत आहे. लस घेतल्यानंतर किती दिवसांनंतर मद्यपान करावे, आहारात काय घ्यावे व काय घेऊ नये? यासारखे प्रश्न विचारले जात आहेत. लसीकरण व मद्यपान याचा फारसा संबंध नाही, तसेच यासंदर्भात संशोधनही झाले नसल्याचे दिसून येत आहे. मद्यपान करायचेच झाले तर लसीकरणापूर्वी व लसीकरणानंतर दाेन आठवडे मद्याचे अतिसेवन टाळावे. कोरोना लसीकरणामुळे रोगप्रतिकार शक्ती निर्माण होणे अपेक्षित असते. तिला अतिमद्य सेवनाने बाधा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मद्यसेवन टाळलेलेच बरे असा सल्लाही वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ देत आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील दारू दुकाने मंगळवारी दुपारपासून बंद झाले आहेत.

आरोग्याच्या दृष्टीने हानीकार

मद्यसेवन अथवा कोणतेही व्यसन हे आरोग्याच्या दृष्टीने हानीकारकच असते. तरुण वयात शाैक किंवा आकर्षण म्हणून सुरू केलेले मद्यसेवन नंतर कधी व्यसनाचे रूप घेत हे कळतच नाही. मद्यसेवनाच्या आहारी गेलेल्या अनेकांचे संसार उदध्वस्त झाल्याची उदाहरणे आहेत. कोरोनाच्या काळात तर मद्याचे अतिसेवन टाळणे गरजेचे आहे. कारण मद्यसेवनामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, असे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. कोरोना लसीकरणाच्या मोहिमेदरम्यान मद्यसेवनाचा मुद्दा पुढे आला आहे. धक्कादायक म्हणजे कोरोनाचा संसर्ग काळात लसीकरण केलेल्या काही शाैकिनांनी तर एक दिवासाचाही गॅप न देता मद्यसेवनाचा शाैक पूर्ण करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या काळात मद्यसेवनामुळे कुणाला उपचारासाठी रुग्णालयात जावे लागल्याचे उदाहरण समोर आलेले नाही.

डाॅक्टरांनी वर्ज्य केले असेल तर मद्यपान टाळावे

केवळ मद्यपान आणि लसीकरण हाच मुद्दा नाही तर काही मद्यशाैकीन अतिसेवन करीत असल्याने त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झालेला असतो. प्रसंगी त्यांच्यावर उपचार करण्याची वेळ येते. काहींचे तर लीव्हर खराब झालेले असते. अशा रुग्णांना डाॅक्टर मद्यपान न करण्याचा सल्ला देतात. अशा रुग्णांनी मद्यपान करूच नये, असा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे. दरम्यान, शासनाने कठोर निर्बंध लादल्यामुळे जिल्ह्यातील दारू दुकाने बंदचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असले तरी याचे काटेकोर पालन होईलच याची शाश्वती नाही. काही महाभाग काळाबाजारात मद्याची विक्री करत असल्याचा अनुभव आहे.

कोरोना लसीकरणानंतर मद्यपान करावे किंवा करू नये याबाबत शासनाच्या कोणत्याही सूचना अथवा मार्गदर्शन नाही. तसे कोणतेही आदेश नाहीत. परंतु मद्यपान करणे आरोग्याच्या दृष्टीने हानीकारक असल्याने नागरिकांनी मद्यपान किंवा त्याचे अतिसेवन टाळावे.

- डाॅ. विशाल पाटील, धुळे जिल्हा कोरोना नोडल अधिकारी

कोरोना लसीकरण आणि मद्यपान यांचा काही एक संबंध नाही. कोरोना लसीकरणानंतर मद्यपान केले तरी त्याचा काही परिणाम होईल असे नाही. परंतु इतर काही कारणांमुळे एखाद्या व्यक्तीला डाॅक्टरांनी मद्यपान करण्यास मनाई केली असेल तर त्याने टाळावे.

- डाॅ. पल्लवी सापळे, अधिष्ठाता, हिरे वैद्यकीय महाविद्यालय, धुळे

धुळे जिल्ह्यात मार्च महिन्यात झालेली दारू विक्री लीटरमध्ये

देशी दारू २,०९,६६२

विदेशी दारू १,७०,०७४

बिअर १,९१,५५२