शिरपूर तालुक्यातील दिव्यांग लाभार्थींना साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:35 IST2021-04-08T04:35:59+5:302021-04-08T04:35:59+5:30

तऱ्हाडी : पंचायत समिती, शिरपूर व समग्र शिक्षा समावेशित शिक्षण अंतर्गत शिरपूर तालुक्यातील पात्र दिव्यांग लाभार्थींना साहित्य वाटप करण्यात ...

Distribution of materials to Divyang beneficiaries in Shirpur taluka | शिरपूर तालुक्यातील दिव्यांग लाभार्थींना साहित्य वाटप

शिरपूर तालुक्यातील दिव्यांग लाभार्थींना साहित्य वाटप

तऱ्हाडी : पंचायत समिती, शिरपूर व समग्र शिक्षा समावेशित शिक्षण अंतर्गत शिरपूर तालुक्यातील पात्र दिव्यांग लाभार्थींना साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी शिरपूरचे गटशिक्षणाधिकारी एस. सी. पवार, शिक्षण विस्तार अधिकारी आर. के. गायकवाड, जी. के. साळुंखे, डी. पी. बुवा, बी. एस. बुवा यांच्या हस्ते चेअर्स, डेजी प्लेअर, अंध काठी, ब्रेल कीट ,एम. आर. कीट, कर्णयंत्र, सी. पी. चेअर्स, सोलर बॅटरी असे सर्व मिळून शंभरजणांना साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी साधन व्यक्ती पी. के. बागुल, विशेष शिक्षक एम. एस. पाटील, आर. एस. पाटील उपस्थित होते. यावेळी या साहित्याचा वापर नियमित करावा, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी पवार यांनी उपस्थित लाभार्थींना केले. या कार्यक्रमाचे नियोजन साधन व्यक्ती यांनी केले होते.

फोटो : शिरपूर तालुक्यातील बलकुवा येथील पात्र दिव्यांग लाभार्थींना साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी गटशिक्षणाधिकारी एस. सी. पवार, शिक्षण विस्तार अधिकारी डी. पी. बुवा, बी. एस. बुवा, कुमावत व लाभार्थी उपस्थित होते.

Web Title: Distribution of materials to Divyang beneficiaries in Shirpur taluka