Video : माणुसकीला काळिमा! मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाल्ले; मृत कोरोना रूग्णाच्या खिशातील ३५ हजार रूपये काढून घेतले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 18:45 IST2021-04-30T18:45:03+5:302021-04-30T18:45:34+5:30
Money taken out from Deadbody of corona patient in Dhule : रुग्णालयात कोरोना विषाणूची बाधा झालेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर रुग्णालयात कार्यरत कर्मचारी मयताच्या खिशातील रोकड व आभूषणे काढत असल्याचे रुग्णालयात कार्यरत cctv कॅमेरात कैद झाले.

Video : माणुसकीला काळिमा! मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाल्ले; मृत कोरोना रूग्णाच्या खिशातील ३५ हजार रूपये काढून घेतले
धुळे : कोरोना महामारीत सर्वत्र हाहाकार माजत असताना काहीजण मदतीसाठी सर्वस्व अर्पण करत आहेत तर काही संधीच सोन म्हणून मिळेल ते घेण्यासाठी माणुसकीची लक्तरे वेशीवर टांगत आहे. असाच प्रकार शहरातील वाडीभोकर रोडवरील खाजगी रुग्णालयात पहावयास मिळाल्याने सोशल मीडियावर व्हायरल झालेला मेसेज म्हणजेच "कोई हात धो रहा तो कोई हातोसे धो रहा" याची प्रचिती धुळेकर नागरिक अनुभवत स्वतः या कसाई रुपी प्रशासनाबद्दल संताप व्यक्त करत आहेत. रुग्णालयात कोरोना विषाणूची बाधा झालेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर रुग्णालयात कार्यरत कर्मचारी मयताच्या खिशातील रोकड व आभूषणे काढत असल्याचे रुग्णालयात कार्यरत cctv कॅमेरात कैद झाले.
ही महिती नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाला दिली असता त्यांनी घडलेला प्रकार झाकण्याचा प्रयत्न केला असा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला. यानंतर नातेवाईकांनी जाब विचारला असता उडवाउडवीची उत्तर देण्यात आली. घडलेल्या प्रकाराबाबत सर्वत्र संताप व्यक्त होत असून देवरूपी मंदिरात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णाची अशी फसवणूक होत असेल तर विश्वस कोणावर ठेवायचा असा प्रश्न रुग्णांच्या नातेवाईकांनी केला. तर रुग्णालय प्रशासन झालेल्या प्रकारावर कारवाई करता की जिल्हा प्रशासन आशा रुग्णालयावर कारवाई करत सर्वसामान्य नागरिकांना विश्वस देतो याची प्रतीक्षा सर्वसामान्य नागरिक करत आहेत.