धुळ्याच्या पथकाची नाशिकला कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 22:40 IST2021-04-06T22:39:38+5:302021-04-06T22:40:00+5:30

मयत स्थितीत मुलाला पाण्याच्या बाहेर काढण्यात धुळ्याच्या राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवांनाना यश

Dhule's team's performance in Nashik | धुळ्याच्या पथकाची नाशिकला कामगिरी

धुळ्याच्या पथकाची नाशिकला कामगिरी

धुळे - नाशिक जिल्ह्यातील पालखेड डाव्या कालव्यात महिलेसह दोन मुलांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला़ यात महिलेसह मुलगीला वाचविण्यात आले़ मयत स्थितीत मुलाला पाण्याच्या बाहेर काढण्यात धुळ्याच्या राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवांनाना यश आले़

चांदवड तालुक्यातील वडनेरभैरव येथील सोनाली विलास तिडके (२८) या महिलेने १० वर्षाचा तेजस आणि ३ वर्षाची दिव्या यांना सोबत घेवून पालखेड डाव्या कालव्यात उडी मारुन आत्महत्या केली़ घटना लक्षात येताच महिलेसह मुलीला वाचविण्यात स्थानिकांना यश आले़ पण मुलाला वाचवू शकले नाही़ नाशिक येथील आपत्ती व्यवस्थापनाच्या मदतीसाठी धुळ्यातून पोलीस निरीक्षक चंद्रकांत पारसकर यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या पथकाने मोठ्या परिश्रमाने मयत स्थितीत मुलाला बाहेर काढले़

Web Title: Dhule's team's performance in Nashik

टॅग्स :Dhuleधुळे