शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
3
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
4
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
5
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
6
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
7
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
8
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
9
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
10
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
11
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
12
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
13
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
14
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
15
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
16
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
17
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
18
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
19
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

बीडीच्या थोटकावरून दरोडा, चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा धुळे पोलिसांनी केला पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2021 12:05 IST

दोन जणांना अटक, आरोपींकडून मुद्देमाल हस्तगत

धुळे- बीडीच्या थोटकावरून दरोडा, चोरी करणाऱ्या आंतरराज्य गुन्हेगार टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून, या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आलेली आहे. आरोपींनी सामोडे (ता. साक्री) तसेच बाभळे (ता.शिंदखेडा) येथे केलेल्या धाडसी चोरीची कबुली दिली आहे. तर आरोपींनी तीन लाख ३० हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.सामोडे (ता. साक्री) येथे १३ जानेवारी २०२१ रोजी पाच शस्त्रधारी दरोडेखोरांनी शरद दयाराम शिंदे यांच्या घरात प्रवेश करून शरद शिंदे यांच्यासह त्यांची पत्नी व मुलाला रिव्हॉलव्हरचा धाक दाखवून  रोख रक्कम, सोने-चांदीचे दागिने असा एकूण ८ लाख ८७ हजार रूपयांचा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच बाभळे (ता.शिंदखेडा) येथील एका कंपनीतून वेगवेगळ्या कंपनीच्या ६६ इलेक्ट्रीक मोटारींची चोरी झालेली होती.याा गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखा धुळे मार्फत समांतर तपास सुरू होता. दोनही ठिकाणच्या घटनास्थळी पोलिसांना बीडीचे अर्धवट जळालेली थोटके दिसून आली. त्यामुळे दोनही गुन्हे एकाच टोळीने केले असावेत असा अंदाज पोलिसांनी काढला. याप्रकरणी पोलिसांनी २६ रोजी संशयित रोहीत कैलास चव्हाण (१९, रा. बावडीया, देवास,मध्यप्रदेश) व अब्दुल सलाम अब्दुल मोमीन शेख (२७, रा.भैसाना,ता. राणीगंज,उत्तरप्रदेश ह.मु. पूर्व हुडको काॉलनी, धुळे) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी बाभळे व सामोडे येथे चोरी केल्याची कबुली दिली आहे. या गुन्हेगारांविरूद्ध  देवास, इंदूर, उज्जैन, धुळे, मुंबई, येथे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने केलेली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDhuleधुळे