शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

धुळे : डेंग्यू व मलेरिया दिवस : लक्षणांनुरूप होतो उपचार, आज रॅलीद्वारे जनजागृती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 21:00 IST

स्वत:ची काळजी घेणे हेच डेंग्यूवरील औषध!

धुळे : जिल्ह्यात गेल्या तीन-चार वर्षात मलेरियाच्या संख्येतघट झाली असली तरी डेंग्यूचे प्रमाण वाढत आहे़ डेंग्यूवर कोणतेही ठोस औषध उपलब्ध नसल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा हिवताप कार्यालयातर्फे करण्यात आले आहे़ राष्ट्रीय डेंग्यू दिन १६ मे रोजी साजरा केला जातो़ त्यानिमित्त जिल्हा हिवताप कार्यालय व मनपातर्फे विविध उपक्रम राबवून जनजागृती केली जाणार आहे़ जिल्ह्यात कारखाने, बांधकामे, सिंचन प्रकल्प, पाणीटंचाई व वाढते नागरीकरण या कारणांमुळे डेंग्यू रूग्णसंख्येत वाढ होत आहे़ ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात सर्वाधिक रूग्णसंख्या आहे़ डेंग्यूवर औषधोपचार नाही!डेंग्यू हा एडिस डासामुळे होत असून या आजारावर कोणतेही ठोस उपचार उपलब्ध नाही़ त्यामुळे केवळ लक्षणांनुसार रूग्णांवर औषधोपचार केले जातात़ शिवाय डेंग्यू आहे किंवा नाही हे एलायझा या चाचणीवरूनच स्पष्ट होते़ मात्र खासगी रूग्णालये प्राथमिक चाचणीवरूनच डेंग्यूचे निदान करतात़ खाजगी दवाखान्यात डेंग्यूच्या चाचणीसाठी ६०० रूपयांपेक्षा अधिक शुल्क आकारू नये, असे आदेश असतांना खासगी रूग्णालयांकडून अधिक शुल्क आकारणी होते़ परंतु कुणीही तक्रार करीत नसल्याने कारवाई होत नाही़ त्याचप्रमाणे जिल्हा हिवताप कार्यालयाला कारवाईचे अधिकारही नाहीत़ मात्र आजार बळावू नयेत यासाठी नागरिकांनी आधीच आजारांपासून काळजी घेणे आवश्यक आहे़ जिल्ह्यात ग्रामीण भागात डेंग्यू व मलेरिया कमी प्रमाणात असला तरी शहरात मात्र हे आजार बळावत आहेत़  चालू वर्षात देखील शहरात एका रूग्णाचा मृत्यू डेंग्यूमुळे झाला आहे़ मनपा व हिवताप कार्यालय संयुक्तपणे जनजागृतीची मोहिम राबविते़ जून महिन्यात पावसाला सुरूवात होत असल्याने डेंग्यू, मलेरिया, चिकनगुणिया यांसारख्या आजारांना कारणीभूत डासांसाठी पोषक वातावरण तयार होत असल्याने नागरिकांनी पाण्याचे भांडे स्वच्छ ठेवावेत, कोरडा दिवस पाळावा, मच्छरदाणीचा वापर करावा, ताप येताच रक्ताची तपासणी करावी, असे आवाहन मनपाकडून करण्यात आले आहे़ 

प्रभागनिहाय फवारणी व जनजागृृती मान्सून काळात डासांची उत्पत्ती डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांना आमंत्रण देत असते. घराघरात साठविण्यात आलेल्या पाण्याबरोबरच बांधकामांची ठिकाणी डासांचे अड्डे बनू लागले आहेत. डासांची ही उत्पत्ती स्थळे नष्ट करण्यासाठी महापालिकेतर्फे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बांधकामे आणि झोपडपट्टया तसेच अन्य ठिकाणी अळीनाशक फवारणी करण्यात येत आहे़ डेंग्यूचा प्रसार करणारा एडिस इजिप्ती डासांची उत्पत्ती फेंगशुई, बांबू प्लँटस, मनीप्लँटससारखी शोभिवंत झाडे, घराजवळ ठेवलेल्या कुंड्या, एसी अशा ठिकाणी होत असल्याचे समोर आले आहे. सांडपाण्याच्या नाल्यांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष असल्यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे