कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:24 IST2021-06-11T04:24:56+5:302021-06-11T04:24:56+5:30

निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील शेतकऱ्यांनी मागील दोन वर्षांपासून पीकविमा काढला होता. त्यानंतर तालुक्यात दोन वेळा वादळ व ...

Deposit the loan waiver amount in the farmer's account | कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा

कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा

निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील शेतकऱ्यांनी मागील दोन वर्षांपासून पीकविमा काढला होता. त्यानंतर तालुक्यात दोन वेळा वादळ व अवकाळीने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मात्र सदर शेतकऱ्यांना पीक विम्याच्या रकमा अद्याप मिळाल्या नाहीत, म्हणून त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर लाभ मिळावा. तसेच जाहीर केलेली कृषी कर्ज माफी योजना विनाअट द्यावी. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले सेटलमेंटचे ५० हजार त्यांच्या खात्यावर टाकावे. शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे पैसे त्यांच्या खात्यावर त्वरित मिळावे .

याप्रसंगी भाजपचे नासिक जिल्हा उपाध्यक्ष संजय भामरे, धुळे जिल्हा भाजपा सरचिटणीस शैलेंद्र आजगे, पिंपळनेर मंडळ उपाध्यक्ष प्रवीण देसले, दिलीप रावसाहेब भामरे, साक्री शहर उपाध्यक्ष विनोद पगारिया, दत्तात्रय खैरनार, आदिवासी आघाडीचे हेमंत पवार, सहकार आघाडीचे योगेश भामरे, तालुका उपाध्यक्ष राकेश दहिते, विनोद पाटील, दलित आघाडीचे अजय लोणखेडे, संदीप माळी, ॲड. सुरेश शेवाळे, कार्तिक रमोळे, योगेश चौधरी आदी उपस्थित होते.

Web Title: Deposit the loan waiver amount in the farmer's account