शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

धुळ्यात शिवसैनिकांनी केली जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 15:25 IST

बॅँकांच्या आडमुठे धोरणाचा शेतक-यांना त्रास; जिल्हाधिकाºयांना दिले निवेदन

ठळक मुद्देशासनाने ११ हजार १०६ थकबाकीदार शेतकºयांची पात्र यादी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला पाठवावी. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेप्रमाणेच राष्टÑीयकृत बॅँकांनी दीड लाखाच्या आतील आणि दीड लाखाच्यावर पात्र लाभार्थी शेतकºयांची यादी ताबडतोब जाहीर करून नोटीसबोर्डावर लावावी.शासनाने राष्टÑीयकृत बॅँकांना कर्जमुक्तीसाठी किती निधी पाठवला याबाबत आकडेवारी स्पष्ट करावी.

लोकमत न्यूज नेटवर्क 

धुळे : कर्जमाफीच्या निर्णयानंतर शासनाने दीड लाखाच्या आतील शेतकºयांच्या खात्यात कर्जमुक्तीचे पैसे वर्ग करावेत. तसेच दीड लाखाच्यावर कर्ज घेतलेल्या शेतकºयांना ओटीएसची सवलत देऊन सहकार्य करावे, असे निर्देश जिल्हा मध्यवर्ती बँकेसह राष्टÑीयकृत बॅँकांना दिले. त्यासाठी शासनाने ३१ मार्चपर्यंत मुदत दिली होती.  परंतु, राष्टÑीयकृत बॅँका शेतकºयांना कुठल्याही प्रकारचे सहकार्य करत नसल्याने शेतकºयांना त्रास होतो आहे. परिणामी, संतप्त शिवसैनिकांनी शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने केली. तत्पूर्वी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, की, शिवसेना पक्षप्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली झालेले आंदोलन व शेतकरी संपामुळे सरकारने छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी सन्मान योजनेंर्तगत ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफीची घोषणा झाली. त्यासाठी जिल्हा बॅँकेसह राष्टÑीयकृत बॅँकाकडून थकबाकीदार शेतकºयांची आकडेवारी मागविली. ही माहिती संकलित केल्यानंतर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बॅँक व राष्टÑीयकृत बॅँकांना शासनाने दिलेल्या निर्देशानुसार ३१ मार्चपर्यंत दीड लाखाच्या आतील शेतकºयांच्या कर्जमाफीचे पैसे वर्ग करायचे होते. तसेच दीड लाखाच्यावर ओटीएसची सवलत देऊन शेतकºयांना सहकार्य करण्याचे सांगण्यात आले होते. परंतु, राष्टÑीयकृत बॅँक शेतकºयांना सहकार्य करत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी जिल्हा प्रमुख हिलाल माळी, माजी जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, महानगर प्रमुख सतीश महाले, कैलास पाटील, डॉ. सुशील महाजन, नरेंद्र अहिरे, दिनेश पाटील, देवराम माळी, चंद्रकांत म्हस्के, रोहिदास माळी, प्रवीण पाटील, हेमराज साळुंखे, पंकज चौधरी, मुकेश खरात, प्रवीण पाटील, प्रभाकर देसले, अशोक गवळी, भिलेश खेडकर, संदीप शिंदे, दिगंबर जाधव आदी उपस्थित होते. 

११ हजार शेतकºयांची माहिती अद्याप कळविलीच नाही धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने शासनाला २००९ ते २०१६ याकालावधित एकूण ५९ हजार १४८ थकबाकीदार शेतकºयांची यादी सादर केली. पैकी शासनाने जिल्हा बॅँकेला  ४८ हजार ४२ शेतकºयांची पात्रता यादी  कळविली. तसेच दीड लाखाच्या आतील थकबाकीदार ४३ हजार ६२ शेतकºयांच्या बॅँक खात्यात १११ कोटी ३ लाख रुपये  वर्ग केले आहेत. उर्वरित ४ हजार ४९५ शेतकरी हे दीड लाखाच्यावर थकबाकीदार असल्याने त्यांना ओटीएसची सवलत दिली आहे. मात्र, त्यापैकी २ टक्के शेतकºयांना त्याचा लाभ घेतला आहे. उर्वरित ११ हजार १०६ थकबाकीदार शेतकºयांची पात्रता यादी शासनाने अद्याप जिल्हा मध्यवर्ती बॅँकेला कळविली आहे. 

अधिकारी अनभिज्ञ शासनाने राष्टÑीयकृत बॅँकांना दीड लाखाच्या आत व त्यावरील थकबाकी शेतकºयांच्या खात्यावर वर्ग केली. आजपर्यंत कर्जमुक्तीच्या पैशाची आकडेवारी किती? ही भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. याबाबत लीड बॅँकेचे अधिकारी तसेच जिल्हा उपनिबंधक यांच्याकडेही यासंदर्भात आकडेवारी उपलब्ध होत पाही. अशा परिस्थितीमुळे शेतकºयांना नाहक त्रास होत आहे.  

टॅग्स :DhuleधुळेShiv Senaशिवसेना