शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्याच्या पाणी टंचाई कृती आराखड्यास विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 18:55 IST

शेवटच्या टप्प्यात मोजक्या गावांना टंचाईची झळ बसू शकते

आॅनलाइन लोकमतधुळे : यावर्षी प्रचंड पाऊस झालेला आहे. त्यामुळे दरवर्षाप्रमाणे पाणी टंचाई भासण्याची शक्यता कमीच आहे. मात्र असले असले तरी जिल्हा परिषदेला पाणी टंचाई आराखडा तयार करावा लागत असतो. मात्र पाणी टंचाईचा पहिला टप्पा सुरू झाला तरी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने अद्याप टंचाई कृती आराखडा तयार केला नाही.धुळे जिल्ह्यातील काही भाग अवर्षणप्रवण क्षेत्रात असल्याने, या जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये दरवर्षी उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाई भासत असते. टंचाई निवारणार्थ दरवर्षी टंचाईच्या काळात जनतेची पिण्याच्या पाण्याची तहान भागविण्यासाठी टॅँकरसह विविध उपाययोजना केल्या जातात. त्यासाठी संपूर्ण जिल्ह्याचा एकत्रित टंचाई कृती आराखडा तयार केला जातो. तहानलेल्या गावांची संख्या, त्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना आदींबाबत तालुकास्तरावरून माहिती संकलित केली जाते. त्याआधारावरच एकत्रितत आराखडा तयार होत असतो.विशेष म्हणजे या आराखड्यातील उपाययोजना तीन टप्यात राबविल्या जातात. टंचाईचा पहिला टप्पा आॅक्टोबर ते डिसेंबर दरम्यान राबविला जातो. दुसरा टप्पा जानेवारी ते मार्च व तिसरा टप्पा एप्रिल ते जून या कालावधीत राबविला जात असतो. यावर्षी टंचाईचा पहिला टप्पा संपून जवळपास दोन महिने संपत आले तरी अद्याप एकत्रित टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आली नसल्याची माहिती समोर आलेली आहे. अधिकाऱ्यांनी टंचाईची बाब फारशी गंभीरपणे घेतलेली नसल्याचे यावरून दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामीण पाणी पुरवठा विभाग पाणी टंचाईचा संभाव्य कृती आराखड्यात महूर्त स्वरूप केव्हा देणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे.दरम्यान जिल्ह्यात मुबलक पाणी असले तरी अगदी शेवटच्या टप्यात पाच-सहा गावांना पाणी टंचाईची झळ बसू शकते असाही अंदाज वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे