विद्यार्थी हिताच्या दृष्टीने घेतलेला निर्णय योग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:34 AM2021-04-13T04:34:28+5:302021-04-13T04:34:28+5:30

निर्णय योग्य कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढत असल्याचा पार्श्वभूमीवर दहावी व बारावीचा परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या ...

A decision made in the best interest of the student | विद्यार्थी हिताच्या दृष्टीने घेतलेला निर्णय योग्य

विद्यार्थी हिताच्या दृष्टीने घेतलेला निर्णय योग्य

Next

निर्णय योग्य कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढत असल्याचा पार्श्वभूमीवर दहावी व बारावीचा परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करता योग्य निर्णय आहे. मात्र यामुळे विद्यार्थ्यांची अभ्यासाची लिंक पुन्हा एकदा तुटणार आहे. शासनाने याबाबत ठोस उपाययोजना काय याबद्दल मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.

-कैलास जैन, चेअरमन हस्ती स्कूल दोंडाईचा

सुरक्षित निर्णय

कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. दहावी-बारावीचा परीक्षा होणे गरजेचे असले तरी त्या सुरक्षित वातावरणात होणे त्याहून जास्त गरजेचे आहे. शिक्षणमंत्र्यांनी घेतला निर्णय योग्य आहे. या निर्णयामुळे विद्यार्थी, प्रशासन व पालकांना सोयीचे होईल. हिमांशू शाह, चेअरमन रोटरी इंग्लिश स्कूल, दोंडाईचा

दडपण आले असते

आजच्या विपरीत परिस्थितीत बरेच विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक कोरोना बाधित आहेत. ऑनलाइन अभ्यास जेमतेम ३०-४० टक्के झाला आहे. परीक्षा आता घेतल्याचे असत्या तर विद्यार्थी व शिक्षक यांचा मनावर दडपण आले असते. प्राचार्य डी. एन. जाधव, दोंडाईचा

आतापासून अंदाज घ्यावा

कोरोनाच्या परिस्थितीत दहावी-बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णयाचे स्वागत आहे. पुढे कशी परिस्थिती राहील याचा अंदाज आज घेणे मुश्किल असले तरी याबाबत आतापासूनच नियोजन असण्याची गरज आहे.

प्राचार्य शरद शर्मा, दोंडाईचा

विद्यार्थ्यांना वेळ मिळेल

कोविड-१९ची स्थिती लक्षात घेऊन शासनाने दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. शासनाचा हा अगदी योग्य निर्णय आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासास पुरेसा वेळ मिळणार आहे. -महेश मुळे, धुळे

परीक्षेची टांगती तलवार कायम

सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन बारावी, दहावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असला तरी, या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये परत एकदा नैराश्याची भावना निर्माण झाली आहे. सततच्या अभ्यासामुळे पठारावस्था येण्याची भीती निर्माण झाली आहे. परीक्षेच्या दडपणाची टांगती तलवार अजून कायम राहणार आहे. या विद्यार्थ्यांना सध्या अभ्यासाचा ताणातून तूर्त तरी मुक्त होता येणार नाही.

प्राचार्य डी. एन. पाटील, साक्री

सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय व्हावा

१०वी व १२वीची परीक्षा विद्यार्थ्यांचं करियर ठरविणाऱ्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्षभरात लॉकडाऊनमुळे या विद्यार्थ्यांच्या अध्ययन-अध्यापनाचा बोजवारा उडाला आहे. शिक्षक असो वा विद्यार्थी या मुख्य घटकांना विश्वासात न घेता, प्राप्त परिस्थितीचा विचार न करता परीक्षेच्या वेळांत परस्पर बदल करणे कुणाच्याच हिताचे नाही. त्यातून चुकीचा संदेश ही जात आहे. यामुळे परीक्षेचे गांभीर्य ही कमी झाले आहे.

प्राचार्य राजेंद्र अग्रवाल, साक्री

Web Title: A decision made in the best interest of the student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.