वलवाडीत तरुणाचा होरपळून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 23:02 IST2019-11-28T23:01:22+5:302019-11-28T23:02:13+5:30

दौलतनगर : भाजलेल्या अवस्थेमुळे हळहळ

The death of a young girl in Walwadi | वलवाडीत तरुणाचा होरपळून मृत्यू

वलवाडीत तरुणाचा होरपळून मृत्यू

धुळे : देवपुरातील वलवाडी शिवारातील दौलतनगरात तरुणाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली़ भाजल्याने त्याचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली़ याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली़ 
दौलत नगरातील कौस्तूभ गेंदालाल बागुल (२५) हा तरुण बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घरी आला़ त्याचे वडील गेंदालाल बागुल हे बाहेर गेलेले होते़ ते शहरात रिक्षा चालवितात़ तर त्याची आई घराशेजारी असलेल्या महिलांशी गप्पा मारत बसली होती़ कौस्तूभ हा नेहमीप्रमाणे घरात आल्यानंतर काही वेळातच त्याचा ओरडण्याचा आवाज आला़ त्याने त्याच्या अंगावर काहीतरी ज्वलनशील पदार्थ टाकून घेतल्याने तो भाजला गेला़ त्याचा ओरडण्याचा आवाज आल्याने त्याच्या आईसह अन्य जण लागलीच घराच्या दिशेने पळाले़ कौस्तूभ हा भाजलेल्या अवस्थेत पडलेला होता़ त्याला तात्काळ हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले़ डॉ़ पूर्वा पाटील यांनी तपासून मयत घोषित केले़ कौस्तुभ याने पत्रकारितेचे शिक्षण घेतले होते़ त्याने शहरातील काही वृत्तपत्रात कामही केले होते़ 

Web Title: The death of a young girl in Walwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.