धुळ्यातील व्यापाºयावर प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 23:05 IST2019-11-28T23:05:06+5:302019-11-28T23:05:43+5:30
सहा जणांविरुध्द देवपूर पोलिसात गुन्हा

धुळ्यातील व्यापाºयावर प्राणघातक हल्ला
धुळे : मागील भांडणाचे निमित्त पुढे करुन व्यापाºयावर सहा जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना बुधवारी दुपारी देवपुरात घडली़
विकास पांडूरंग अहिरे (३३, रा़ गायकवाड चौक, धुळे) यांनी देवपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे़ त्यानुसार, बुधवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास देवपुरातील नदीकाठी भागातील सावरकर पुतळ्याजवळ घडली़ दिलीप बबन केदार, योगेश सोनवणे, शांताराम अहिरे, पंकज जगताप, नागेश साळवे, मनोज साळवे (सर्व रा़ रमाबाई आंबेडकर नगर, देवपूर, धुळे) या संशयितांनी रस्त्यात अडविले़ लोखंडी रॉड आणि बिअरच्या बाटल्याने विकास अहिरे यांच्यावर वार करुन त्यांना गंभीर जखमी केले़ हाताबुक्यांने मारहाण केल्याने त्यात त्यांना दुखापत झाली़ या मारहाणीमुळे त्यांच्या खिशात असलेली सहा हजाराची रोकड कुठेतरी गहाळ झाली आहे़
याप्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात या संशयितांविरुध्द फिर्याद दाखल झाल्याने विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ हेड कॉन्स्टेबल ईशी घटनेचा तपास करीत आहेत़
दरम्यान, सावरकर पुतळा भागात भरदिवसा ही मारहाणीची घटना घडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते़ बरेच जण या भागात येणाºया बसची वाट थांबलेले असतात़ अशातच ही घटना घडल्याने काही काळ भितीचे वातावरण तयार झाले होते़