शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात दीड दिवस संपूर्ण ‘लॉकडाऊन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 21:57 IST

आदेश पारीत : प्रभावी अंमलबजावणी होणार

धुळे : ‘कोरोना’ विषाणूच्या प्रतिबंधासाठी जिल्ह्यात शुक्रवारी रात्री १२ वाजेपासून ते रविवारच्या पहाटे ५ वाजेपर्यंत संपूर्ण ‘लॉकडाऊन’ (संचारबंदी) करण्यात येणार आहे. प्रभारी जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांनी याबाबत आदेश काढला आहे.राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात साथीचा रोग प्रतिबंधक कायदा लागू केला आहे. परस्पर संपर्कामुळे या विषाणूचा संसर्ग व प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेवून मानवी जीविताला, आरोग्याला किंवा सुरक्षिततेला संकट निर्माण होवू शकते. तसेच पोलिस अधीक्षक यांनी सादर केलेला अहवाल पूर्णत: संचारबंदी लागू करण्याबाबत त्यांनी विनंती केली आहे. या पार्श्वभूमीवर प्रभारी जिल्हाधिकारी जगदाळे यांनी त्यांना प्राप्त अधिकारांनुसार संपूर्ण धुळे जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात फौजदारी दंडसंहिता प्रक्रिया कलम १४४ (१) (३) अन्वये आदेश काढला आहे. यात अत्यावयशक सेवेसह कायदा व सुव्यवस्थासाठीचे मनुष्यबळ अपवाद असतील, असेही जिल्हाधिकारी जगदाळे यांनी म्हटले आहे.पिंपळनेरला १४ पर्यंत पूर्ण लॉकडाऊनपिंपळनेरला मालेगाव येथून भाजीपाला येतो. मालेगावला ५ कोरोनाचे रुग्न सापडले असल्याने दक्षता म्हणून ग्रामपंचायतीने पिंपळनेर आणि सामोडे शुक्रवारपासून १४ एप्रिलपर्यंत पाच दिवस पूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. पाच दिवस सर्व दुकाने बंद राहतील. कोणालाही घराबाहेर निघता येणार नाही.सेंधव्याला आणखी दोन रुग्ण सापडलेमध्यप्रदेशातील सेंधवा येथे कोरोनाबाधीत आणखी दोन रुग्ण सापडले़ रुग्णांची संख्या १२ वरुन १४ पर्यंत पोहचली आहे़ त्यामुळे पळासनेर येथे आरोग्य यंत्रणा सज्ज झाली़

टॅग्स :Dhuleधुळे