शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

रेमडेसिविर इंजेक्शन घेण्यासाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:36 IST

शहरासह खान्देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असताना त्यातील गंभीर झालेल्या कोरोना रुग्णांवर उपचार करताना रेमडेसिविर इंजेक्शनची गरज भासत ...

शहरासह खान्देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असताना त्यातील गंभीर झालेल्या कोरोना रुग्णांवर उपचार करताना रेमडेसिविर इंजेक्शनची गरज भासत असल्याने संबंधित डॉक्टर ते इंजेक्शन आणण्याचा सल्ला कुटुंबीयांना देत आहेत़ मात्र प्रत्यक्षात हे इंजेक्शन शिरपूर वगळता खान्देशात अन्य ठिकाणी उपलब्ध होत नसल्याने एकेका इंजेक्शनसाठी धडपड करण्याची वेळ कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाइकांवर आली आहे़ ज्या खासगी रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू आहे, त्यांच्याकडून या इंजेक्शनची मोठी मागणी असून, ती पुरविण्यात जिल्हा प्रशासन अपयशी ठरत आहे़, तर दुसरीकडे खासगी मेडिकलमध्ये मोठी रक्कम मोजून हे इंजेक्शन घ्यावे लागत आहे़ सरकारी रुग्णालयात रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध व्हावे यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असतानाही जिल्हा प्रशासन हे इंजेक्शन उपलब्ध करून देत नसल्याची बाब समोर आली आहे़ त्यामुळे इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने त्या ठिकाणच्या नातेवाइकांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे़

मात्र, तालुक्याचे विकासरत्न आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, नगराध्यक्ष जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल व उद्योगपती चिंतनभाई पटेल यांच्या योगदानातून त्यांनी धुळे व नदुंरबार जिल्ह्यांतील जनतेला अत्यल्प किमतीत हे इंजेक्शन उपलब्ध करून दिले आहे़

विशेषत: विकासाची दूरदृष्टी असलेले आमदार अमरिशभाई पटेल यांनी इंजेक्शन पुरवठा करून रुग्णांना दिलासाबरोबरच रुग्णांना वैद्यकीय मदत मिळण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली आहे़ पटेल बंधू नेहमीच रुग्णांच्या मदतीसाठी धावून जात असतात़ अनेकांना आर्थिक मदतीसोबतच शस्त्रक्रिया मोफत करून देण्यासाठी प्रयत्नशील असतात़ कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना बेड मिळत नसल्यामुळे तेदेखील मोफत उपलब्ध करून दिले जात आहे़ माणुसकीच्या नात्याने पटेल बंधू सर्वांसाठी मदतीसाठी तत्पर असतात़ रेमडेसिविर इंजेक्शन गरजू लोकांना मिळते की नाही ते पाहण्यासाठी आर. सी़ पटेल संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण हेदेखील कार्यरत आहेत़

रुग्णांच्या नातेवाइकांना भर उन्हात मेडिकलच्या बाहेर उभे राहून चटके खावे लागत होते, ते होऊ नये म्हणून त्या ठिकाणी मंडप टाकण्यात आला आहे़