शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री, आमच्यासाठी फडणवीसच सर्वस्व; गणेश नाईकांचे ठाण्यात सूचक वक्तव्य
2
पाकिस्तान, पाकिस्तानसारखा खेळला! विजयासाठी आयर्लंडसमोर टाकाव्या लागल्या धापा
3
सीईटीची साईट क्रॅश, प्रचंड मनस्ताप; नागपूरचे साैम्या दीक्षित व पार्थ असाटी यांना १०० टक्के
4
पाकिस्तानची विझण्यापूर्वीची फडफड! गोलंदाजांना सूर गवसला, पण क्षेत्ररक्षणात गचाळपणा दिसला 
5
काँग्रेसला इतक्या जागा कशा मिळाल्या? चौकशी व्हावी, राहुल गांधींवर रामदास आठवलेंचा पलटवार
6
'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
7
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
8
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
9
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
10
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

भूमिलेख अधिकाऱ्यासह १३ जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 4:47 AM

मे़ शहा कन्स्ट्रक्शनचा शहरातील वरवाडे भागात सिटी सर्व्हे नंबर ३५०७ ब व सिटी सर्व्हे नंबर ३५०३ हे दुय्यम निबंधक ...

मे़ शहा कन्स्ट्रक्शनचा शहरातील वरवाडे भागात सिटी सर्व्हे नंबर ३५०७ ब व सिटी सर्व्हे नंबर ३५०३ हे दुय्यम निबंधक यांच्याकडील दस्त क्रमांक १५३७/२००३ व १५३८/२००३ अन्वये विकसन करारनामा व कधीही न रद्द होणारे जनरल मुखत्यारपत्राद्वारे हेमलता भूपेंद्रकुमार शहा-जैन (रा.जैन गल्ली शिरपूर) यांचेकडून सुरुवातीस ६९ लाख रुपयात ठरविण्यात आला होता. परंतु सदर सर्व्हेमध्ये काही जागा राखीव असल्याने नव्याने बोलणी होवून ४६ लाख ३१ हजार ५०० रुपयात निश्चित करण्यात आला़. त्याबाबत पुरवणी विकसन करारनाना २७ सप्टेंबर २००४ रोजी दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदविण्यात आला. हेमलता जैन यांनी त्यांचे दोन्ही मिळकतीत असलेले सर्व हक्क अधिकार करून दिले आहेत. त्यामुळे हेमलता जैन यांच्या सदर मिळकतीत कुठलाही हक्क, अधिकार राहिलेला नव्हता.

दरम्यान, सिटी सर्व्हे नंबर ३५०७ ब या मिळकतीवर भाविका कॉम्प्लेक्स या नावाची इमारत बांधून सर्व सदनिका या त्रयस्थ व्यक्तींना विक्री केलेल्या आहेत. त्याबाबत दुय्यम निबंधक कार्यालयात नोंद करण्यात आली. नोव्हेंबर २०२० मध्ये भाविका कॉम्लेक्सच्या पश्चिमेकडील रस्त्यावर काही जणांनी रातोरात पत्र्याचे शेड उभारले. शेड उभारण्याचे काम सुरू असतांना त्यावेळी तेथे उपस्थित राहुल शालिक देवरे (रा. वरवा), सुनील देवीदास माळी (रा़. वाघाडी), रूपेश अर्जुन माळी (रा़.वरवाडे) यांनी ही जागा ही हेमलता जैन यांच्याकडून खरेदी केल्याचे सांगितले. मात्र सिटी सर्व्हे कार्यालयात जाऊन चौकशी केली असता ९ ॲाक्टोबर २०२० रोजी हेमलता जैन यांनी सि.स.नं.३५०७/ब यापैकी पश्चिमेकडील ३८० चौ.मी. एवढी जागा राहुल देवरे, सुनील माळी, रूपेश माळी या तिघांना बेकायदेशीरपणे तसेच शिरपूर येथील भूमिलेख कार्यालयातील तत्कालीन अधिकारी/कर्मचारी यांना हाताशी धरून मूळ दस्तऐवजामध्ये खाडाखोड/फेरफार करून अस्तित्वात नसलेली बखळ जागा दाखवून विक्रीचा व्यवहार केला. तसेच भाविका कॉम्प्लेक्समधील दुसऱ्या मजल्यावरील एका सदनिकेवर ३ लाख ४५ हजार रुपयांचा बोझा लावलेला असून देखील भूषण नंदलाल चौधरी (रा़. अमळनेर) यास विक्री केलेला आहे. तसेच सि.स.नं ३५०३ मधील तिनही मोकळे प्लॉट भटू माळी, राकेश अग्रवाल व लाखन भील यांचेशी संगनमत करून साक्षीदार गिरीश विजय पाटील, आनंदा जगन्नाथ कोळी यांच्या समक्ष खरेदी विक्रीचा व्यवहार केलेला आहे़

ही जागा, प्लॉट, बांधकाम विक्रीचा सर्व अधिकार हे शहा कन्स्ट्रक्शन कंपनी पुणे यांना दिलेला असतानादेखील संशयितांनी केलेल्या कराराचा भंग करून फिर्यादीसह शासनाची फसवणूक केली आहे.

याबाबत शहा कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक धर्मेश दीपक शहा (रा.पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी हेमलता भूपेंद्रकुमार जैन-शहा, भूपेंद्र अमृतलाल शहा (रा़. जैन गल्ली), मानसी राकेश अग्रवाल,राकेश अशोक अग्रवाल (रा.सराफ बाजार), राहुल देवरे, रूपेश माळी, भूषण चौधरी, सुनील माळी, भटू भिवसन माळी (रा.वरवाडे शिरपूर), रा.सराफ बाजार, लखन मख्खन भिल रा.रामसिंग नगर, गिरीश विजय पाटील रा.वरवाडे, आनंदा कोळी, तत्कालीन अधिकारी भूमि अभिलेख कार्यालय शिरपूर अशा १३ जणांविरोधात शिरपूर पोलिसात भादंवि कलम ४२०, ४०६, ४६६, ४६८, ४६९, ४७०, ४७१, १२० ब ३४ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.