शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ११ वाजेपर्यंत कुठे किती झाले मतदान?
2
राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
3
Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
4
ऑनलाईनही पैशांचं वाटप होतंय; उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा गंभीर आरोप
5
World Record! काय भारी धावली राव; भारताच्या लेकीनं रचला इतिहास, जिंकलं सुवर्ण
6
Fact Check: अखिलेश यादव PM मोदींना भेटले? १० वर्ष जुना व्हिडिओ व्हायरल; जाणून घ्या सत्य
7
...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा
8
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
9
ख्रिस गेल पुढच्या IPL मध्ये पुन्हा खेळताना दिसणार? विराटच्या VIDEO नंतर चर्चांना उधाण
10
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
11
'मुलाला सांभाळता येत नाही'; नेटकऱ्यांच्या कमेंट्स जिव्हारी लागल्या, 'त्या' बाळाच्या आईने स्वतःला संपवलं
12
गौरव मोरे ते स्पृहा जोशी; मराठमोळ्या या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
13
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
14
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
15
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
16
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल
17
नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास
18
Som Pradosh 2024: नशिबाची साथ मिळत नसेल तर आज सोम प्रदोष व्रत करा,भाग्य बदलेल; वाचा व्रतविधी!
19
Nrusinha Jayanti 2024: २१ मे नृसिंह जयंती: भगवान विष्णुंच्या नृसिंह अवतारामागे दडलेले रहस्य जाणून घ्या!
20
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस

कोरोनामुळे धुळ्यातील ग्रामीण भागात अंधश्रध्देचे फुटले पेव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 11:48 AM

अफवांचे पिक : वलवाडी शिवारातील कॉलनी परिसरात शनिवारी रात्री बाराला दिवे

धुळे : कोरोना विषाणू संसर्गाच्या भितीच्या सावटामुळे अफवा आणि अधंश्रध्दांना ऊत आला आहे़ आतापर्यंत केवळ अफवांचे पिक होते़ परंतु आता अंधश्रध्दाही बळावली आहे़ रात्री बारा वाजता निंबाच्या झाडाखाली दिवे लावले तर कोरोनाचे संकट टळेल, अशी अंधश्रध्दा ग्रामीण भागासह शहरातही पसरली असून शनिवारी रात्री बारा वाजता अनेक महिलांनी दिवे लावून अंधश्रध्दा पाळली़सध्या सर्वत्र कोरोना हाच विषय आहे़ कोरोनाचा विषाणू ज्या वेगाने पसरत आहे; त्याच वेगाने अफवा देखील पसरत आहेत़ कोरोनाच्या या उद्रेकात अफवांचे पिक आले असून त्यात समाज भरडला जात आहे़ उष्ण वातावरणात हा विषाणू जगू शकत नाही, भारतात तापमान जास्त असल्याने कोरोनाची भिती बाळगण्याची गरज नाही अशी अफवा सुरूवातील पसरली आणि आज ती फोल ठरली आहे़ त्या पाठोपाठ तुरटी, फणस, मद्य, कापूर, आयुर्वेदीक आणि होमियोपॅथी औषधे, गोमूत्र असे एक ना अनेक उपचार सोशल मीडियावरुन नुसते व्हायरलच झाले नाहीत तर अंमलातही आणले गेले़ कोरोनाचा संसर्ग मांसाहाराशी जोडणे ही सर्वात मोठी अफवा ठरली़ तसेच कोरोनाच्या संसर्गासाठी मध्यंतरी पाळीव प्राण्यांना दोषी ठरविण्यात आले़ अनेकांनी पाळीव प्राणी घराबाहेर काढले़ त्यानंतर नॉस्टॅडॅमसच्या भविष्यवाणीचेही फोटा व्हायरल झाले़ कोरोना हे चीनने जगावर सोडलेले अस्त्र आहे आणि हे सिध्द करण्यासाठी काही एडीट केलेले फोटोही सोशल मीडियावर गाजले़ जनता कर्फ्यूच्या दिवशी ड्रोनद्वारे आकाशातून फवारणी होणार असल्याची अफवा धुळे शहरात गेले दोन दिवस होती़ अफवांच्या पिकात वाढलेला हा संसर्ग कमी होण्याचे नाव घेत नाही़ देशासह राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या तासागणिक वाढतच आहे़ त्यामुळे महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे़शासन, प्रशासनाच्या पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोना प्रभावीपणे सुरू असताना शनिवारी सायंकाळनंतर ग्रामीण भागामध्ये एक वेगळीच अफवा वाऱ्यासारखी पसरली़ वडाच्या किंवा निंबाच्या झाडाखाली दिवा लावला तर कोरोनाचे संकट टळेल अशी ती अफवा होती़ त्यामुळे गावागावात महिलांनी दिवे लावण्याचा सपाटा लावला होता़ ही अफवा सोशल मीडियावरही चांगलीच व्हायरल झाली़अंधश्रध्दा दिवे पेटविण्याचीवडाच्या किंवा निंबाच्या झाडाखाली दिवा पेटवला तर घरातील मुलांवरचे कोरोनाचे संकट टळेल़ एक मुलगा असेल तर एक दिवा आणि दोन मुले असतील तर दोन दिवे लावावे़ त्यामुळे शनिवारी सायंकाळपासून ग्रामीण भागात महिलांनी दिवे लावण्यासाठी गर्दी केली होती़ ही अंधश्रध्दा शहरात पोहोचायलाही उशिर लागला नाही़ ग्रामीण भागातील महिलांनी शहरातील नातेवाईकांना याबद्दल माहिती दिली़ वलवाडी शिवारात कॉलनी परिसरातील काही महिलांनी इतरही महिलांना घरोघरी जावून जागे केले़ रात्री बारा वाजता झाडाखाली दिवे पेटविण्यात आले़ कोरोनाच्या प्रतिबंधासाठी शासनातर्फे गर्दी टाळण्याचे प्रयत्न सुरू असताना अशा प्रकारच्या अफवांमुळे गर्दीला प्रोत्साहन मिळत आहे़

टॅग्स :Dhuleधुळे