शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना ‘विषाणूचा’ चा सर्वांनी एकजुटीने करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 12:55 IST

चंद्रकांत सोनार । लोकमत न्यूज नेटवर्क ‘कोरोना विषाणू मानवी आरोग्यासाठी घातक ठरणारा विषाणु आहे़ कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना ...

ठळक मुद्देसकाळी ७ ते रात्री ९ या कालावधीत जनता कर्फ्यू महापालिका कर्मचाºयांच्या रजा देखील रद्दआदेशाचे पालन करून घरातूच काम करा३१ मार्चपर्यत जमाव बंदी लागु थर्मल स्कॅन यंत्राद्वारे शरीरातील तापमानाची तपासणी

चंद्रकांत सोनार ।लोकमत न्यूज नेटवर्क‘कोरोना विषाणू मानवी आरोग्यासाठी घातक ठरणारा विषाणु आहे़ कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत. या उपाययोजनांचा भाग म्हणून आणि कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी रविवार २२ मार्च रोजी सकाळी ७ ते रात्री ९ या कालावधीत जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. या कर्फ्यूमध्ये नागरिकांनी एकजुट दाखवित घराबाहेर निघू नका, प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन आयुक्त अजिज शेख यांनी ‘लोकमत’ शी बोलतांना केले़प्रश्न : कोरोना प्रतिबंधसाठी म्काय उपाय योजना केल्या जात आहे ?उत्तर : ३१ मार्चपर्यत शासनाने जमाव बंदीचा आदेश लागु केला आहे़ त्यासाठी शहरातील शाळा, महाविद्यालय, हॉटेल, बाजारपेठ, यात्रा, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे़ नागरिकांनीही आदेशाचे पालन करावे़ मनपा प्रशासनाकडून वेळोवेळी जनजागृती करण्याचे कार्य सुरू राहणार आहे़प्रश्न : सर्वधर्मीयांचे लग्न समारंभ बंद ठेवण्यासाठी काय नियोजन केले?उत्तर : महापालिका कार्यक्षेत्रातील लॉन्स, हॉटेल तसेच मंगल कार्यालय बंद ठेवण्यासाठी सुचना दिल्या आहेत़ तर मनपाकडून लग्नासाठी परवानगी देणे बंद केले आहे़ मुस्लिम बांधवाचे लग्न या महिन्यात अधिक असल्याने बैठक घेऊन त्यांना देखील रजिस्टर लग्न करण्याचे विनंती केली आहे़ तसेच चर्च, मंदिर, मशिद देखील बंद ठेवण्यात आले आहे़प्रश्न : रूग्णांची तपासणीसाठी काय नियोजन करण्यात आले आहे?उत्तर : पुणे व मुंबई व अन्य शहरातून ट्रॅव्हल्सद्वारे धुळ्यात येणाऱ्या प्रवाशांची मनपाकडून कसुन चौकशी व थर्मल स्कॅन यंत्राद्वारे शरीरातील तापमानाची तपासणी टोल नाक्यावर सकाळी ४ ते सायंकाळी ६ पर्यक केली जात आहे़ कोरोना बाधित संशयित रूग्ण आढळून आल्यास तातडीने हिरे शासकीय वैद्यकीय रूग्णालयात पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे़आपले घरात थांबणे म्हणजे देश हित जोपासणे..कोरोना विषाणुचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ३१ मार्चपर्यत जमाव बंदी लागु केली आहे़ ही सक्ती नसुन प्रत्येकाची जबाबदारी आहे़ शासनाकडून घेण्यात आलेला निर्णय सर्वाच्या हितासाठी आहे़ प्रत्येकाने शासनाने घेतलेल्या निर्णयाचा आदर करून सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून नये, वेळोवेळी हात स्वच्छ धुवा, घरातच थांबा़प्रशासनाचे आपल्यावर लक्षकोरोना विषाणुचा अधिक प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी विविध उपाय-योजना केल्या जात आहे़ कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचे आदेश दिले आहे़ आदेशाचे पालन करून घरातूच काम करा, सार्वजनिक ठिकाणी फिरू नका, महापालिका कर्मचाºयांच्या रजा देखील रद्द करण्यात आल्याचे आयुक्त अजिज शेख यांनी ‘लोकमत’ शी बोलतांना सांगितले़

टॅग्स :Dhuleधुळे