शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

तपासणी पथकांना सहकार्य करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2020 10:38 PM

जिल्हाधिकारी : क्षय-कुष्ठरुग्ण शोधमोहिमेचा शुभारंभ

धुळे : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत धुळे जिल्ह्यात संयुक्त व सक्रिय क्षयरुग्ण कुष्ठ रुग्ण शोध मोहीम १६ डिसेंबरपर्यंत राबविण्यात येईल. या आजारांच्या लक्षणांनी ग्रस्त नागरिकांनी तपासणीसाठी येणाऱ्या पथकांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात क्षयरुग्ण व कुष्ठ रुग्ण संयुक्त शोध मोहिमेचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, महानगरपालिकेचे उपायुक्त गणेश गिरी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मनीष पाटील, डॉ. जे. सी. पाटील आदी उपस्थित होते. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत धुळे जिल्ह्यात संयुक्त व सक्रिय क्षय व कुष्ठ रुग्ण शोध मोहीम १ ते १६ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. कोविड -१९ च्या आपत्कालीन परिस्थितीमुळे क्षय व कुष्ठ रुग्णांचे निदान व उपचार तातडीने करून जास्तीत जास्त रुग्ण शोधून उपचारांवर आणणे व संसर्ग आटोक्यात ठेवणे या संदर्भात आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडून रुग्णांच्या लवकर निदानासाठी विविध उपाय योजना सुचविल्या आहेत. रोगशास्त्रीय अभ्यासानुसार क्षय व कुष्ठ आजाराचे रुग्ण निदान व औषधोपचारापासून वंचित राहिल्यास रुग्णाला या रोगापासून निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीचा सामना करावा लागतो. त्याचप्रमाणे त्यांच्या सहवासातील इतर लोकांना सुद्धा या आजाराचा धोका संभवतो.या पार्श्वभूमीवर समाजातील सर्व क्षय व कुष्ठ रुग्णांचा शोध घेऊन औषधोपचार चालू करणे हा अभियानाचा उद्देश आहे. ही मोहीम संपूर्ण जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामीण कार्यक्षेत्र व शहरी ३० टक्के अतिजोखीम ग्रस्त ठिकाणी ही मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत आशा स्वयंसेविका व प्रशिक्षित पुरुष स्वयंसेवक त्या- त्या भागातील घरोघरी भेट देवून या आजारांच्या लक्षणांची माहिती देतील. लक्षणांनी ग्रस्त असतील, तर त्यांना पूर्णपणे माहिती देण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. पाटील, कुष्ठरोग विभागाचे सहसंचालक डॉ. रमाकांत पाटील यांनी केले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे