शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

धुळे शहर व देवपूरमधील ‘संपर्क’ तोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 13:13 IST

पांझरेवरील तीन पुलावरील वाहतूक बंद : अत्यावश्यक सेवेसाठी लहान पुल फक्त सुरु

धुळे : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्यासह देशात लॉकडाऊन केलेले असताना धुळ्यात देखील टप्प्या-टप्प्याने कठोर अंमलबजावणी सुरु झालेली आहे़ पांझरेवर असणारे पूल बंद करण्यात आल्यामुळे शहर आणि देवपूर भागाचा संपर्क थांबविण्यात आलेला आहे़ अत्यावश्यक सेवेसाठी केवळ लहान पुल सुरु ठेवण्यात आलेला आहे़ दरम्यान, वर्दळीचे चौक सुध्दा आता बंद केले जात आहेत़शहरातील नागरीकांचे परस्पर संपर्कामुळे कोरोना विषाणुचा संसर्ग व प्रसार होण्याची शक्यता गृहीत धरुन मानवी जिवीताला धोका होऊ नये याकरीता काही प्रतिबंधात्मक उपाययोजना पोलिसांकडून आखल्या जात आहेत़ शहरातील पांझरा नदीवरील गणपती मंदिर ते मोराणकर बंगलाकडे जाणारा पूल, कालिका माता मंदिर ते जयहिंद स्विमींगकडे जाणारा पूल, महात्मा गांधी पुतळा ते पंचवटीकडे जाणारा मोठा पूल असे तीन पूल रहदारीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले़ तर,आपत्कालिन व अत्यावश्यक सेवेसाठी पांझरा नदीवरील दातासरकार ते सावरकर पुतळा दरम्यान असलेला लहान पूल सुरु ठेवलेला आहे़ आवश्यकता असलेल्यांनाच या पुलावरुन वावरता येणार आहे़ याठिकाणी पोलिसांचा खडा पहारा असणार आहे़पूल बंद होण्याची ही दुर्मिळ घटनाकोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वर्दळ असणारे पूल बंद होण्याची ही दुर्मिळ घटना आहे, अशा प्रतिक्रिया शहरातील ज्येष्ठ मंडळींनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या़ पुर्वीच्या काळी खजाना लुटीची घटना घडल्यानंतर लूट करणाऱ्यांना पकडण्यासाठी मोठा पूल पोलिसांनी बंद केलेला होता़ तसेच १९६९ मध्ये पांझरा नदीला महापूर आलेला होता़ यावेळी मात्र पूल बंद करण्याची वेळ प्रशासनावर आलेली नव्हती़ पूलच बंद झाला होता़ प्लेग, स्वाईन फ्लू असे विविध आजार आले होते़ त्यावेळी मात्र वाहतुकीसाठी पूल बंद करण्याची वेळ ओढवली नव्हती़ यंदा मात्र पूलच बंद करण्याचा कटू प्रसंग ओढवला आहे़

टॅग्स :Dhuleधुळे