शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
4
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
5
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
6
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
7
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
8
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
9
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
10
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
11
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
12
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
13
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
14
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
15
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
16
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
17
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
18
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
19
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
20
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग बांधवांना लॉकडाऊनमध्ये दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 23:03 IST

समाजकल्याण विभाग : पीठ गिरणी, सायकल, मिरची कांडप यंत्र खरेदीसाठी अर्थसहाय्य बँक खात्यात जमा

धुळे : कोरोनाचा संसर्ग आणि त्याला रोखण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून केलेल्या लॉकडाऊनमध्ये जिल्हा परिषदेने दिव्यांग बांधवांना दिलासा दिला आहे़ पाच टक्के राखीव निधीतून विविध उपयोगी वस्तुंच्या खरेदीसाठी दिव्यांग बांधवांच्या बँक खात्यामध्ये थेट अनुदान जमा करण्यात आले आहे़, अशी माहिती जिल्हा परिषदेतील सूत्रांनी दिली़दिव्यांग व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांना घरगुती उद्योग, व्यवसाय सुरू करण्यास हातभार लागावा म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उत्पन्नातील पाच टक्के निधी दिव्यांग बांधवांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे़ याआधी केवळ तीन टक्के निधी राखीव ठेवला जात होता़ तो देखील अपेक्षेप्रमाणे दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी खर्च केला जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या़ त्यामुळे केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे राज्य सरकारच्या ग्रामविकास मंत्रालयाने २५ जून २०१८ रोजीच्या आदेशान्वये सर्व जिल्हा परिषदांना दिव्यांगांसाठी पाच टक्के स्वनिधी राखीव ठेवण्याचे आदेश दिले होते़ त्यानुसार दरवर्षी पाच टक्के स्वनिधीतून दिव्यांग बांधवांना अर्थसहाय्य केले जात आहे़ विविध वस्तुंच्या खरेदीसाठी शंभर टक्के अनुदान दिले जाते़मागील आर्थिक वर्षात धुळे जिल्ह्यात दिव्यांग लाभार्थ्यांकडून पाच टक्के राखीव निधीतून वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते़ त्यानुसार पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव छाननीअंती समाजकल्याण विभागाच्या सभापतींच्या परवानगीने पालकमंत्र्यांपुढे मंजूरीसाठी ठेवले होते़ पालकमंत्र्यांच्या मंजुरीनंतर दिव्यांग बांधवांना लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झाली होती़ परंतु कोरोनाचा संसर्ग आणि त्यामुळे केलेल्या लॉकडाऊनमुळे शासकीय कार्यालयातील मनुष्यबळ कमी करण्याचे आदेश प्राप्त झाल्याने दिव्यांग बांधवांना प्रत्यक्ष लाभ देण्याची प्रक्रिया तब्बल तीन महिने लांबली़ दरम्यान, पाचव्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये शासनाने शिथीलता दिल्यानंतर आणि शासकीय कामकाज पूर्ववत सुरू करण्याचे आदेश प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने लाभार्थ्यांच्या अंतीम याद्या तयार करुन प्रत्यक्ष बँक खात्यामध्ये अनुदान वर्ग केले़ दिव्यांग बांधवांच्या बँक खात्यात शंभर टक्के अनुदानाची रक्कम जमा झाली आहे़लॉकडाऊनमध्ये सर्व व्यवहार ठप्प असल्याने दिव्यांग बांधवांवर उपासमारीची वेळ आली होती़ परंतु या लाभामुळे त्यांना दिलासा मिळाल्याच्या प्रतिक्रिया आहेत़

टॅग्स :Dhuleधुळे