शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
3
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
6
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
7
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
8
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
9
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
10
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
11
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

जोपासलेल्या १०० वृक्षांचा साजरा केला वाढदिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 12:11 PM

संडे अँकर । वृक्षसंवर्धन समितीचा स्तुत्य उपक्रम; तरुणांसाठी प्रेरणादायी; नवीन १०० रोपांची लागवड करुन संवर्धन

लोकमत न्यूज नेटवर्कशिंदखेडा : येथील तरुण एकत्र येऊन शहरातील विरदेल रोडच्या दुतर्फा गेल्यावर्षी सुमारे १०० झाडे जगवली. त्यांचा प्रथम वाढदिवस एकमेकांना पेढे भरून साजरा केला.तर यावरच ते थांबले नाहीत या वर्षी सुमारे ५०० झाडे घेऊन त्यात नागरिकांना ४०० वाटप केले व या तरुणांनी यावर्षी परत १०० झाडे स्वत: लक्ष्मीनारायण कॉलनी, साईलीला नगर, साई नंदन गार्डन, अमरधाम या ठिकाणी लावून त्यांची काळजीही ते घेत आहेत. त्यांचा हा उपक्रम इतरांसाठी प्रेरणदायी असून इतर तरुणांनीही त्यांचे अनुकरण केल्यास शिंदखेडा शहर व परिसर हिरव्या वनराईने फुलण्यास निश्चितच मदत होईल. यासाठी इतर तरुणांनीही पुढे येण्याची गरज आहे.वृक्षसंवर्धन समितीने एक वर्षाच्या झालेल्या झाडांचा वाढदिवस साजरा करून पेढे भरवून मागील वर्षी लावलेली झाडे पाण्या अभावी जळत असलेल्या झाडांकडे पाहून वृक्षसंवर्धन समितीने वृक्षांना जगवण्याच्या निश्चय केला आणि भर उन्हात घरून पाण्याच्या भरलेल्या ड्रमने पाणी देण्यास सुरुवात केली. जवळपास शंभरच्यावर रोपांना नियमित पाणी देण्याचे काम सुरु केले. आज त्या गोष्टीला एक वर्ष पूर्ण होत असून वृक्ष संवर्धन समितीचे योगेश चौधरी, जीवन देशमुख, रोहित कौठळकर, महेंद्र यादगिरीवार, बबलू मराठे, भूषण मराठे यांनी वृक्षांचा वाढदिवस साजरा करून पेढे भरून आनंद साजरा केला.तसेच या वर्षी त्यांनी सुमारे ५०० झाडे आणली. त्यात शहरातील नागरिकांना आवाहन केले की ज्यांना झाडे लावून जगवण्याची व झाड कुठे लावले त्याचा फोटो व दर महिन्याचा फोटो व्हाट्सपवर टाकणे बंधनकारक केले. त्यानुसार नागरिकांनी सुमारे ४०० झाडे नेऊन जगवली व नियमित दर महिन्याचा झाडासोबतचा सेल्फी फोटो नागरिक नियमित पाठवत असल्याचे वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष योगेश चौधरी यांनी सांगितले. तसेच उर्वरित १०० झाडे कॉलनी परिसरातील ओपन स्पेस व अमरधाममध्ये लावली असून त्यांची देखभाल व नियमित पाणी देणे सुरु असल्याचे सांगितले. त्यातील सर्व झाडांना नागरिकांकडून ट्रीगार्डसाठी पैसे न मागता ऐपतीप्रमाणे नागरिकांनी २, ५, १० या प्रमाणे ट्रीगार्ड आणून दिली. त्यामुळे झाडाचे संरक्षण होण्यास मदत होत आहे. त्यात ते ८० टक्के झाडे जगवण्यात यशस्वी झालो असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.

टॅग्स :Dhuleधुळे