खंडित वीजपुरवठ्यामुळे व्यवसाय ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:42 IST2021-03-01T04:42:00+5:302021-03-01T04:42:00+5:30

नेर हे मोठे बाजारपेठेचे गाव आहे. त्यामुळे पंचक्रोशीतील नागरिक लहानसहान वस्तू खरेदी, दुरुस्तीसह अन्य कामांसाठी नेर येथे येतात. त्यात ...

Business disrupted due to power outage | खंडित वीजपुरवठ्यामुळे व्यवसाय ठप्प

खंडित वीजपुरवठ्यामुळे व्यवसाय ठप्प

नेर हे मोठे बाजारपेठेचे गाव आहे. त्यामुळे पंचक्रोशीतील नागरिक लहानसहान वस्तू खरेदी, दुरुस्तीसह अन्य कामांसाठी नेर येथे येतात. त्यात लाइट, पंखे, टीव्ही, मोटर, मिक्सर, सेटअप बॉक्स आदी दुरुस्तीसह विविध शासकीय कामांसाठी लागणारे झेरॉक्स, छायाचित्र काढणे आदी कामांसाठी येतात. त्यात वीज खंडित राहिल्यास नागरिकांना आणि व्यावसायिकांना तासन‌्‌तास विजेची प्रतीक्षा करीत उभे राहावे लागते. तसेच आता उन्हाळा सुरू होत असल्याने पंखे, कूलर दुरुस्तीच्या कामांना वेग आला आहे. त्यातल्या त्यात शीतपेय व्यावसायिकांकडे मोठे फ्रीज असल्याने वीजपुरवठा खंडित झाल्याने त्यांचे मोठे नुकसान होत आहे. स्थानिक वीज वितरण कंपनीच्या कर्यालयात वारंवार तक्रारी करूनही वीज ट्रीप होण्याची समस्या सुटत नाही. आधीच गेल्या वर्षी कोरोनामुळे व्यवसाय बंद होते. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी व्यावसायिकांनाही मोठी कसरत करावी लागली आहे. त्यांच्या व्यवसायाचा आणि नागरिकांच्या गैरसोयीचा विचार करून ही समस्या त्वरित सोडवण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Business disrupted due to power outage