बोराडी गाव तीन दिवस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 12:54 PM2020-07-11T12:54:58+5:302020-07-11T12:55:18+5:30

कोरोनाचा दुसरा रूग्ण आढळला : अधिकाऱ्यांनी केली गावात पहाणी

Boradi village closed for three days | बोराडी गाव तीन दिवस बंद

dhule

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
बोराडी :गावात ८८ वर्षी वृद्धाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, येथील रूग्ण संख्या दोन झालेली आहे. संसर्ग वाढू नये यासाठी बोराडी गाव तिन दिवस शंभर टक्के बंद राहणार आहे. रूग्णाचा रिपोर्ट आल्यानंतर तो परिसर सिल करून बंद करण्यात आले. बाधित रूग्णासह त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना तपासणीसाठी कोविड सेंटरला पाठवण्यात आले.
बोराडी येथील भाजीपाला व्यापारी संकुल परिसरातील ८८ वर्षी वृद्ध कोरोनाबाधित आढल्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. आज सकाळपासूनच सकाळपासूनच प्रशासनाच्या हालचालींना वेग आला. तसेच सकाळीच कंटेनमेंट झोनची पाहणी करून बोराडी येथील भाजी बाजार संकुल समोरील परिसर सील करण्यात आला. उपसरपंच राहुल रंधे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील वस्त्यांमध्ये सॅनीटायझर फवारणी व धुरळणी करायला सुरुवात आली. या प्रसंगी विस्तार अधिकारी आर. के. गायकवाड, बोराडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी नीलिमा देशमुख, डॉ.सुनील पावरा, श्याम पावरा, तलाठी कोकणी, ग्रामसेवक तंमखाने, आदींनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. बोराडी भाजी बाजार संकुलासमोरील भागातील नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या. याप्रसंगी शशांक रंधे,रमण पावरा,भरत पावरा, ग्रामपंचायत सदस्य संजय पाटील, डोंगरसिंग पावरा, सुखदेव भिल, तसेच ग्रामपंचायत बोराडी कर्मचारी सुरेश शिंदे, दिपक भालेराव उपस्थित होते.

Web Title: Boradi village closed for three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.