शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवस शेतात पडून असलेल्या तरुणाच्या मृतदेहाचे केले दफन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 22:30 IST

शिरपूर तालुका । तरुणाच्या खिशात आत्महत्या करीत असल्याची सापडली चिठ्ठी

शिरपूर : मुंबई-आग्रा महामार्गावरील सावळदे गावालगत एका ऊसाच्या शेतात पुरूष जातीचे कुजलेले प्रेत मिळून आले़ मात्र मयताच्या खिशात कोरोनाच्या त्रासामुळे आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी सापडल्यामुळे त्याचे शवविच्छेदनासाठी कोणीही पुढे आले नसल्यामुळे अखेर त्याच्या मृतदेहावर शनिवारी सायंकाळी दफनविधी करण्यात आलेला आहे़गुरुवारी सायंकळी सावळदे येथील शेतकरी समाधान भिका महाजन यांच्या ऊसाच्या शेतात पुरूष जातीचे कुजलेले प्रेत आढळले. माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील यांच्यासह पोलिस घटनास्थळी दाखल झालेत़ पोलिसांना कुजलेल्या प्रेताच्या खिशात चिठ्ठी मिळाली.त्यात अजय नावाने कोरोनाच्या त्रासाने त्रस्त झाल्यामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचे हिंदी भाषेत लिहिले होते. त्यामुळे पोलिस प्रशासनाने आरोग्य विभागाला कळविले़ रात्री ८ वाजेच्या सुमारास खर्दे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ़ मनोज पाटील यांनी घटनास्थळी शवविच्छेदन करता येणार नाही़ सदर कोरोनाग्रस्ताचे शवविच्छेदन धुळ्याला करण्यासाठी पाठवावे लागेल सांगितले. त्यानंतर हे प्रेत शुक्रवारी सायंकाळपर्यंत तेथेच पडून होते. त्याठिकाणी दोन पोलीस तैनात होते. यासंदर्भात पोलीस आणि महसूल विभाग एकमेकाकडे बोट दाखवित खो - खो चा खेळ सुरु आहे.प्रेताची विल्हेवाट लावण्यासंदर्भात पोलिसांना पत्र देण्यात आले. त्यानुसार पोलीस त्याचठिकाणी प्रेताची विल्हेवाट लावणार आहे, असे डॉ. प्रसन्न कुलकर्णी यांनी सांगितले़तर, त्या तरुणाचा मृतदेह आढळून आल्यानंतर त्याठिकाणी सुरक्षेच्या दृष्ट्रीकोनातून दोन पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. अनोळखी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी दिली़मृतदेह नेमका कोणाचा, याची उत्सुकताउसाच्या शेतात तरुणाचा मृतदेह आढळल्यानंतर त्याची कुठे ओळख पटते का याची खातरजमा पोलिसांनी दोन दिवस केली होती़ मात्र कोणीही येत नाही आणि त्या मृतदेहाची अवहेलना होऊ नये म्हणून शनिवारी सायंकाळी त्याच्यावर दफनविधी केल्यानंतर शिरपूर शहर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे़ भविष्यात कोणी यासंदर्भात तक्रार केल्यास पुन्हा हे प्रकरण उकरुन निघू शकते़ या दृष्टीने देखील पोलिसांनी काळजी घेतली आहे़ दरम्यान, हा मृतदेह कोणाचा याची उत्सुकता कायम आहे़

टॅग्स :Dhuleधुळे