शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

भाजपत जल्लोष,अजित पवार समर्थक द्विधा मनस्थितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 22:07 IST

विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया । शिवसेनेकडून आमचाचं मुख्यमंत्री होईल असा दावा

धुळे : राज्यात भाजपच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाल्याने जिल्ह्यात शहरासह विविध ठिकाणी जल्लोष करून नव्या सरकारचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. तर जिल्हा राष्टÑवादी काँग्रेस मधील प्रमुख पदाधिकारी यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता. अजित पवार समर्थक राष्टÑवादीतील पदाधिकाऱ्यांनी प्रतिक्रीया देण्याचे टाळले. ते द्विधा मनस्थितीत दिसून आले. मात्र राष्टÑवादीचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसेसह अन्य पदाधिकाºयांनी मात्र आपण शरद पवार यांच्या सोबत असल्याचे स्पष्ट केले.शहरात आतषबाजी, नृत्यराज्यात भाजपचे सरकार अस्तित्वात येताच महानगर अध्यक्ष अनुप अग्रवाल, नगरसेवक प्रदीप कर्पे, नगरसेवक हिरामण गवळी, यशवंत येवलेकर यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्त्यांनी वि.का. राजवाडे चौकात जल्लोष केला. यावेळी परस्परांना पेढे भरवून तसेच उत्स्फूर्त नृत्य करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली.तालुका भाजपतर्फेही जल्लोषसरकार स्थापनेचे तालुका भाजपतर्फेही जल्लोष करून स्वागत करण्यात आले. यावेळी पक्षनेते सुभाष देवरे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रा.अरविंद जाधव, तालुकाप्रमुख देवेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत ग्रामीण भागातील बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परस्परांच अभिनंदन करून पेढे भरविले.शिरपुरात ठिकठिकाणी जल्लोषशहरात या निमित्त मिरवणूक काढून जल्लोष झाला. पक्ष कार्यालयापासून बाजारपेठेपर्यंत तसेच तेथून आमदार अमरिशभाई पटेल यांच्या निवासस्थानापर्यंत येऊन मिरवणुकीचा समारोप झाला. यावेळी पेढे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार काशीराम पावरा, पक्षाचे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, माजी नगराध्यक्ष प्रभाकर चव्हाण, जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, तालुकाध्यक्ष राहुल रंधे उपस्थित होते. यानंतर येथे विजयस्तंभापासून जल्लोष करत आमदार कार्यालयात पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाचे नेते व माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांची भेट घेतली.मालपूर येथेही स्वागतशिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथेही देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सकाळी नऊ वाजेच्या सुमारास येथील बसस्थानकावरील पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन फटाक्यांंची आतषबाजी करून आनंद उत्सव साजरा करत जल्लोष केला. यावेळी श्रावण अहिरे, सचिव बारकू मोरे भाऊसाहेब मराठे, तुकाराम माळी, विरेंद्र गोसावी, भटू रावल, रवींद्र पाटील लक्ष्मण पानपाटील, श्रीराम अहिरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Dhuleधुळे