शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

दुर्मीळ घटनेचे साक्षीदार होण्याचे साऱ्यांनाच वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 22:12 IST

कंकणाकृती सूर्यग्रहण : खगोलीय घटनेचा नयनरम्य अविष्कार

धुळे : त्रिखंडातील दुर्मीळ घटना म्हणून पाहिल्या जाणाºया सूर्यग्रहणाचे आता साऱ्यांनाच वेध लागले आहेत. हे ग्रहण संपूर्ण भारतातून विविध प्रकारे दिसणार आहे. कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यात हे कंकणाकृती तर महाराष्टÑातून हे खंडग्रास स्वरुपात दिसणार आहे.त्यामुळे या ग्रहणाबाबत प्रत्येकालाच कुतुहल आहे.अवकाशातील अद्भूत घटना पाहण्यासाठी खगोलप्रेमींच नव्हे तर साºयांचीच उत्सुकता असते. त्यामुळे २६ डिसेंबर रोजी होणाºया खंडग्रास सूर्यग्रहणाकडेही साºयांचे डोळे लागले आहेत. यापूर्वी १९९५, १९९९ व २००९ मध्ये खग्रास सूर्यग्रहण, २०१० मध्ये कंकणाकृती सूर्यग्रहण झाले होते.ही एक वैज्ञानिक व शैक्षणिक घटनाही असल्यामुळे पालकांनी मुलांसह योग्य साधने वापरुन सुरक्षित पद्धतीने हे ग्रहण अवश्य पहावे. यातून मुलांच्या विचारांचा, ज्ञानाचा आवाका वाढेल व अंतराळाशी सर्वांचे नाते जडेल. आयुष्यात मोजक्याच वेळा सुर्यग्रहण पाहण्याची संधी येते. त्यामुळे खगोलीय विज्ञानाचा हा नयनरम्य अविष्कार पाहण्याची संधी दवडू नये, असे आवाहन खगोलप्रेमींनी केले आहे.४मार्गशिर्ष कृ. ३० अमावस्या दि.२६ डिसेंबर रोजी भारतासह संपूर्ण आशिया खंड, आफ्रिका खंड, इथिओपिया आणि आॅस्ट्रेलियात उत्तरेकडील प्रदेशात ग्रहण दिसणार आहे. सकाळी ८.०४ वाजता स्पर्श, मध्य ९.२२, मोक्ष १०.५५, सर्वकाळ २.५१, पुण्यकाळ ग्रहणस्पर्श ते मोक्षापर्यंत. ग्रहणाचे वेध २५ डिसेंबर सुर्यास्तापासून. रात्री १२ वाजल्यापासून मोक्षापर्यंत वेध पाळावे.४ग्रहण स्पर्श ८.०४ ते मोक्ष १०.५५ पर्यंत पाणी पिणे, नाश्ता, भोजन करु नये. कारण हवा ही अशुद्ध असते. स्नान, जप, नित्यकर्म, तर्पणकर्म करावी.४ग्रहण राशीचे फळप्राप्ती- कर्क, तुला, कुंभ, मीन राशीला- शुभ, मेष, मिथुन, सिंह राशीला- मिश्रफळ, वृषभ, कन्या, धनु, मकर राशीला- अनिष्ठ फळ आहे.२६ डिसेंबर रोजी होणारे सूर्यग्रहण संपूर्ण भारतातून दिसेल. बहुतांश भागातून ते खंडग्रास स्वरुपास पहावयास मिळेल तर दक्षिण भारतातील तिरप्पुर, कोर्इंबतूर, मंगलोर, त्रिची (तिरुचेरापल्ली) येथून कंकणाकृती स्वरुपात दिसेल. दक्षिण भारतातून सूर्य सुमारे ९३ टक्के झाकोळला जाईल तर मध्य भारतातून ६५ टक्के झाकोळला जाईल. ग्रहण स्पर्श ८ वाजून ६ मिनिटे आणि ४० सेकंदांनी सुरु होईल तर ग्रहण मध्य ९ वाजून २४ मिनिटे आणि ४१ सेकंदांनी होईल. ग्रहण अस्त सकाळी १० वाजून ५८ मिनिटे आणि २० सेकंदांनी होईल. सदर खंडग्रास सूर्यग्रहण २ तास ५१ मिनिटे टिकेल. सदर सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी योग्य सौर चष्म्याचा वापर करुन पहाता येऊ शकते. यावर्षी हे शेवटचे सूर्यग्रहण असून पुढीलवर्षी २१ जून २०२० रोजी होणारे कंकणाकृती सूर्यग्रहण धुळ्यातून खंडग्रास स्वरुपात दिसेल. अमॅच्युर एॅस्ट्रॉनॉमि क्लबतर्फे सूर्यग्रहण टेलिस्कोपद्वारे दाखविण्यात येणार असून सर्वांसाठी ते नि:शुल्क आहे. अधिक माहितीसाठी रत्नेश पंडीत यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आलेअ आहे.

टॅग्स :Dhuleधुळे