कोरोनाबाबत तऱ्हाडी येथे जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:38 IST2021-04-23T04:38:23+5:302021-04-23T04:38:23+5:30

यावेळी पंचायत समिती, शिरपूरचे ग्रामविस्तार अधिकारी पथकप्रमुख आर. जी. पावरा यांच्या सोबत म़ंडल अधिकारी भटेसिंग बोरसे, सरपंच ...

Awareness about Corona at Tarhadi | कोरोनाबाबत तऱ्हाडी येथे जनजागृती

कोरोनाबाबत तऱ्हाडी येथे जनजागृती

यावेळी पंचायत समिती, शिरपूरचे ग्रामविस्तार अधिकारी पथकप्रमुख आर. जी. पावरा यांच्या सोबत म़ंडल अधिकारी भटेसिंग बोरसे, सरपंच जयश्री धनगर, ग्रामविकास अधिकारी जी. वाय. पाटील, पोलीसपाटील प्रतापसिंह गिरासे, युवा सेनेचे सुनील धनगर, तलाठी भारती पवार, बंडू गिरासे यांनी ग्रामस्थांना चौकात, गल्लीत व किराणा दुकान मेडिकल भाजीपाला विनाकारण फिरणाऱ्यांना कोविड-१९ आजार किती भयंकर आहे, हे ग्रामस्थांना अनेक उदाहरणे देऊन सांगितले.

आजार असल्यास नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क करा. विनामास्कचे गावात कोणीही फिरू नये. सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत किराणा दुकान व भाजीपाला यांनी विक्री करावी. अत्यावश्यक सेवा, दवाखाना व मेडिकल चोवीस तास सुरू ठेवा, असे आवाहन करण्यात आले. या कोविड-१९ जनजागृती मोहिमेत जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक गणेश पवार, परिचारिका, दीपाली बडगुजर, माध्यमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस व आरोग्यसेवक उपस्थित होते.

Web Title: Awareness about Corona at Tarhadi