शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

कोविड रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा बिल, ३१ रुग्णांलयांना ऑडीटबाबत नोटीसा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:36 IST

गेल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णालयातून बाधित असलेले रुग्ण मोठ्या प्रमाणावर घरी सोडले जात आहे. ही समाधानाची बाब असलीतरी त्याचवेळेस त्या ...

गेल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णालयातून बाधित असलेले रुग्ण मोठ्या प्रमाणावर घरी सोडले जात आहे. ही समाधानाची बाब असलीतरी त्याचवेळेस त्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांकडून अव्वाच्या सव्वा बिलाची आकारणी होत आहे. तशा तक्रारी देखील महापालिकेकडे येत असल्याने काही रुग्णालयात पथकाने धाड टाकून बिलाची रक्कम देखील कमी करुन रुग्णांच्या नातेवाईकांना दिलासा दिला हाेता. पण, यानंतर सर्वच रुग्णालयांना ऑडिटबाबत नोटीस देण्यात आलेल्या आहेत.

नोटीसमध्ये प्रामुख्याने या बाबींचा समावेश

रुग्णालयांना महापालिका प्रशासनाने ऑडीटबाबत नोटीस दिल्यानंतर त्यात रेट बोर्ड लावणे, बेड किती याचा उल्लेख आणि बिलांच्या तपासणीचा संदर्भ देण्यात आलेला आहे.

८ तक्रारीचा निपटारा

महापालिकेकडे तक्रार आल्यानंतर पथक जाण्यापूर्वीच रुग्णांचा प्रश्न सुटलेला होता. त्यामुळे पथकाला जावून ८ तक्रारीवर कारवाई करण्याचा कटू प्रसंग आला नाही.

१७ रुग्णांना झाला फायदा

वाढीव बिल घेत असल्याची तक्रार महापालिकेकडे प्राप्त झाल्यानंतर पथकाने धाड टाकली. करण्यात आलेल्या बिलाची आकारणी याची तपासणी केली. ३७ लाख ७० हजार ९५० रुपयांवरुन १६ लाख ९४ हजार १५० रुपये इतके बिल कमी करुन दिले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून स्वतंत्रपणे काही रुग्णालयांनी केवळ कोरोनाबाधितांना घेण्याचे धोरण आखले. त्यांच्यावर उपचार केला जात असलातरी त्यांचे डिस्चार्ज केल्यावर बिलांची मोठी रक्कम रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडे मागितली जात आहे. जवळपास ही बिले लाखांच्याखाली नसल्याचेही समाेर आले आहे.