शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

पथविक्रेत्यांना आत्मनिर्भर बनविण्याचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 21:25 IST

महापालिका : २५० पेक्षा अधिक पथविक्रेत्यांचे बँकांकडे आॅनलाईन अर्ज

धुळे : केंद्र शासन पुरस्कृत पथविक्रेता आत्मनिर्भर योजनेतून खेळते भांडवल प्राप्त करण्यासाठी आतापर्यंत धुळे शहरातील अडीचशेपेक्षा अधीक पथविक्रेत्यांनी विविध बँकांमध्ये आॅनलाईन पध्दतीने अर्ज सादर केले आहेत़दरम्यान, या योजनेच्या अंमलबजावणीसाठी धुळे महानगरपालिकेने समिती गठीत केली आहे़ या समितीची बैठक गेल्या सोमवारी अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली़ नागरी उपजीविका अभियानातर्फे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते़ बैठकीला सहायक आयुक्त पल्लवी शिरसाठ, तुषार नेरकर, फेरीवाला समिती सदस्य नितीन बंग, जयश्री शहा, अग्रणी बँक व्यवस्थापक मनोजकुमार दास, ए़ यु़ फायनान्सचे व्यवस्थापक जाकी कटारिया, शहर वस्तीस्तर संघ अध्यक्षा प्रिया माळी, प्रतिनिधी जिजाबाई फुलपगारे, मनपा बाजार विभाग प्रमुख किशोर सुडके, दीपक खोंडे आदी उपस्थित होते़भाजीपाला, फळे, तयार खाद्यपदार्थ, चहा, पाव, अंडी, कापड, चप्पल, पुस्तके, स्टेशनरी यासह इतर लहान व्यवसाय करणाऱ्या पथविक्रेत्यांना कोरोना आणि लॉकडाऊनची सर्वाधिक झळ बसली आहे़ त्यामुळे सध्या त्यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे़ त्यांना पुन्हा उभे करण्यासाठी केंद्र शासनाने ही योजना सुरू केली आहे़धुळे मनपाने अंमलबजावणीला सुरूवात केली असून बँकांकडे आॅनलाईन अर्ज सादर केले जात आहेत़ अडीचशेपेक्षा अधिक अर्ज आले आहेत़ सामान्य पथविक्रेत्यांना बँका कसा प्रतिसाद देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे़काय आहे केंद्राची योजना४कोरोना आणि लॉकडाऊनमुळे विस्कळीत झालेली आर्थिक घडी बसविण्यासाठी केंद्र शासनाने पथविक्रेते आत्मनिर्भर योजना सुरू केली आहे़ या योजनेत पथविक्रेत्याला खेळते भांडवल उपलब्ध करुन देण्यासाठी बँकांमार्फत १० हजार रुपयांचा पतपुरवठा कर्ज स्वरुपात उपलब्ध करुन दिला जाईल़ नियमीत परतफेड केल्यास व्याजात सात टक्के सूट मिळेल़ तसेच पत निर्माण झाल्यास भविष्यात मोठे कर्ज उपलब्ध होण्याची हमी मिळेल़ डिजिटल व्यवहार केल्यास १२०० रुपये कॅशबॅकचा लाभ मिळेल़या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड मोबाईल क्रमांकाशी संलग्न असणे आवश्यक आहे़ महानगरपालिकेतील प्रकल्प किंवा बाजार विभागामार्फत शिफारसपत्र दिले जाईल़ त्यानंतर लाभार्थ्याने स्वत: किंवा सेतू सुविधा केंद्रात जावून बँकेकडे आॅनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे़

टॅग्स :Dhuleधुळे