शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
2
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
3
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
5
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
6
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
7
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
8
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
9
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
10
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
11
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
12
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
13
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
14
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
15
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

नरडाणा औद्योगिक वसाहतीतील रस्ते कामांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 3:37 PM

औद्योगिक विकास मंडळातर्फे केले जाणार काम : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ना-हरकत प्रमाणपत्र देण्यास मान्यता

ठळक मुद्देशिरपूर पॉवर प्रा.लि. हा उद्योग पूर्णत्त्वास आलेला आहे. याठिकाणी वीज निर्मिती सुरू झाली आहे. तर वंडर सिमेंट या कंपनीच्या भूखंडावर कारखान्याचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. या शिवाय इतर उद्योगांसाठीदेखील हा रस्ता आवश्यक आहे. येथे असलेले उद्योग व कारखान्यात मालाची ने आण करणे व येथील परिसरात उद्योग वाढीसाठी येथील खराब रस्त्याची दुरुस्ती करून मजबुतीकरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय औद्योगिक विकास महामंडळाने घेतला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने जिल्हा परिषद प्रशासनाकडे ना-हकरत प्रमाणपत्राची मागणी केली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे  : नरडाणा औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या गाव रस्ते आणि अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. परिणामी, तेथील कंपन्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. यावर पर्याय म्हणून औद्योगिक  विकास महामंडळाने काम करण्याची तयारी दर्शविली आहे. यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडे औद्योगिक विकास महामंडळाने ना-हरकत प्रमाणपत्राची मागणी केली होती. त्याला जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाली आहे.  शिंदखेडा तालुक्यातील वाघोदे, जातोडे शिवारात २२४ हेक्टर क्षेत्रावर नरडाणा एमआयडीसी टप्पा क्रमांक १ विकसित करण्यात येत आहे. तसेच बाभळे शिवारात टप्पा क्रमांक दोन अंतर्गत ४३१ हेक्टर क्षेत्र विकसित होत आहे. जातोडे शिवारात शिरपूर पॉवर प्रा.लि.अल्ट्राटेक सिमेंट व वंडर सिमेंट यासारखे मोठे उद्योग आहेत. असे असतानाही तेथील रस्त्यांची गेल्या काही दिवसात प्रचंड दुरवस्था झाली होती. येथील कंपन्या व काही कारखान्यांकडे ये-जा करण्यासाठी नरडाणा-मेलाणे-जातोडे हा रस्ता आहे. मात्र, गेल्या काही दिवसात या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारित हा रस्ता येत असून या रस्त्याची दुरुस्ती आतापर्यंत झाली नाही. औद्योगिक विकास महामंडळ निधी खर्च करणार या रस्त्याची एकूण लांबी २०.५० किलोमीटर एवढी आहे. तर रुंदी ५० मीटर डांबरी पृष्टभाग असलेली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ पासून नरडाणा औद्योगिक वसाहतीपर्यंत ५.२५० किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण करणे आवश्यक आहे. हा रस्ता जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील आहे. मात्र, तूर्त तरी या रस्त्याकडे जिल्हा परिषद प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. दरम्यान औद्योगिक विस्ताराच्या दृष्टीने तसेच कंपन्यांमधील माल वाहतुकीच्या दृष्टीने या ठिकाणी रस्त्यांचा विकास होणे आवश्यक आहे. याकरिता  एमआयडीसी प्रशासनाने ५.२५० किलोमीटर रस्ते कामाची दुरुस्ती व मजबुतीकरणाचा निर्णय घेतला आहे. याकरिता औद्योगिक विकास महामंडळ निधी खर्च करणार आहे.  मात्र, रस्त्याचे मजबुतीकरणासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या ना-हकरत प्रमाणपत्र आवश्यक होते. 

टॅग्स :Dhuleधुळेzpजिल्हा परिषद