हायमास्ट बसविण्याच्या कामाला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:36 IST2021-03-18T04:36:11+5:302021-03-18T04:36:11+5:30

जैताणे आरोग्य केंद्रात लसीकरण जैताणे : साक्री तालुक्यातील जैताने प्राथमिक आरोग्य केंद्रात शासनाच्या सूचनानुसार काेराेना ...

Approval for installation of high mast | हायमास्ट बसविण्याच्या कामाला मंजुरी

हायमास्ट बसविण्याच्या कामाला मंजुरी

जैताणे आरोग्य केंद्रात लसीकरण

जैताणे : साक्री तालुक्यातील जैताने प्राथमिक आरोग्य केंद्रात शासनाच्या सूचनानुसार काेराेना लसीकरणाची माेहीम राबविण्यात येत आहे. आठवड्यातून साेमवार, बुधवार, शुक्रवार या दिवशी क्रमांकानुसार नागरिकांचे लसीकरण करण्यात येते. त्यासाठी आरोग्य पथकाकडून नावनाेंदणी, तपासणी करून मग लसीकरण केले जाते.

जि.प.तील एक प्रवेशद्वार बंदच

धुळे : जिल्हा परिषदेत प्रवेश करण्यासाठी दोन प्रवेशद्वार आहेत. मात्र कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, येणाऱ्यांच्या गर्दीवर नियंत्रण यावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानाच्या दिशेने असलेले प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे. आता फक्त मुख्य प्रवेशद्वार सुरू ठेवण्यात आलेले आहे.

५० टक्के उपस्थितीची अंमलबजावणी नाही

धुळे : राज्य शासनाने शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्यांची ५० टक्के उपस्थितीचे आदेश दिलेले आहेत. मात्र येथील जिल्हा परिषदेत अद्याप त्याची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. येथे सर्वच विभागाचे कर्मचारी १०० टक्के उपस्थित राहत असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Approval for installation of high mast