शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
4
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
5
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
6
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
7
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
8
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
9
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
10
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
11
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
12
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
13
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
14
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
15
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
16
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
17
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
18
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
19
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
20
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

श्रीकृष्ण प्रणामी मंदिरात वार्षिक महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 23:07 IST

सोनगीर येथील सुमारे १५० वर्ष प्राचीन मंदिरात आज १०८ दिव्यांची महाआरती

लोकमत न्यूज नेटवर्कसोनगीर : येथील श्रीकृष्ण प्रणामी मंदिरात सुरू असलेल्या वार्षिक महोत्सवानिमित्त श्री ५ तारतम सागर साप्ताहिक पारायणाचे वाचन भाविकांकडून सुरु आहे. रविवार २१ रोजी संध्याकाळी ६ वाजता पारायणाची पूर्णहुती श्री ५ महामंगल पुरी धामचे आचार्य श्रीश्री १०८ सूर्यनारायणदासजी महाराज यांच्याहस्ते सोशल मिडिया माध्यमातून होणार आहे. यानिमित्त १०८ दिव्यांची महाआरती करण्यात येणार आहे.तारतम सागर गं्रथाचे १८ हजार ७५८ ओवी आहेत. दररोज २५०० ते ३५०० ओवींचे वाचन होत असते. तारतम सागर ग्रंथाचे १८ भाग आहेत. दररोज सकाळी आरती करून पारायण वाचनास सुरुवात होत असते. पण सध्या देशावर कोविड-१९ महामारीचे मोठे संकट असल्याने बाहेर ठिकाणाहून कोणतेही स्थानकाहून आचार्य, संत येऊ शकत नसल्याने दररोज सोशल मीडियाच्या माध्यमातून पारायण शुभारंभ होत आहे. आतापर्यंत श्रीकृष्ण प्रणामी मंदिर शक्तीनगर दिल्लीचे गादीपती श्रीश्री १०८ परिन सखीजी महाराज, प्राणनाथ धाम डाकोर (गुजरात)चे गादीपती श्रीश्री १०८ सुमित कृष्ण ठाकूरजी महाराज, भावती पुरीधाम फुलपुर भैया (उत्तरप्रदेश) येथील गादीपती ब्रम्हानंद महाराज, श्री ५ पद्मावती पुरीधाम येथील संत गांधी पुजारी, प्राणनाथ ज्ञान केंद्र बोरीवली येथील विदुषी रचिता दीदी आदींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पारायण शुभारंभ व प्रवचन केले.मंदिरात सामाजिक अंतराचे काटेकोरपणे पालन करून ५ साप्ताहिक पारायण सुरू आहेत. पारायणाच्या माध्यमातून मुक्ती मिळावी, हा उद्देश समोर ठेऊन वार्षिक ५ पारायण महोत्सवाचे नियोजन सोनगीर येथील कासार गल्लीतील सुमारे १५० वर्षांपूर्वीच्या प्राचीन श्रीकृष्ण प्रणामी मंदिरात करण्यात आले आहे.हा पारायण महोत्सव कार्यक्रम आचार्य श्रीश्री १०८ सूर्यनारायणजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. तसेच विदुषी रचिता दीदी यांचे देखील मार्गदर्शन मिळत आहे. सदर कार्यक्रमाचे संचालन मंदिर ट्रस्टचे सचिव अनिल कासार करीत आहे.कार्यक्रम यशस्वीतेसाठी पुजारी जगदीश कासार, संजय कासार, प्रशांत तांबट, बाईजुराज महिला मंडळाचे शोभा कासार, रुपाली कासार, भाग्यश्री कासार, शशी कासार, पुष्पाबाई कासार, बबिता तांबट, मंगला कासार, मीराबाई कासार, दीपाली कासार, शशिकलाबाई कासार, भारती कासार आदी परिश्रम घेत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे