पोलिसात तक्रार दिल्याचा राग, आजीसह काका-काकूला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:36 IST2021-04-01T04:36:09+5:302021-04-01T04:36:09+5:30

याबाबत रवींद्र नामदेवराव पाटील (५४) या पानटपरी चालकाने देवपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. बुधवारी पहाटे पावणे दोन वाजेच्या ...

Anger over reporting to police, beating of uncle and aunt along with grandmother | पोलिसात तक्रार दिल्याचा राग, आजीसह काका-काकूला मारहाण

पोलिसात तक्रार दिल्याचा राग, आजीसह काका-काकूला मारहाण

याबाबत रवींद्र नामदेवराव पाटील (५४) या पानटपरी चालकाने देवपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. बुधवारी पहाटे पावणे दोन वाजेच्या सुमारास पुतण्या विशाल उमेश पाटील, वृषभ उमेश पाटील (दोघे रा. ग. द. माळी हाऊसिंग सोसायटी, देवपूर, धुळे) हे दोघे स्वप्नील चौधरी, रोहित सानप, वृषभ कोळी, व पप्पू पवार यांना घेऊन घरात घुसले. त्यांच्या हातात तलवार, चाकू, लोखंडी दांड्या होत्या. यावेळी त्यांनी विमलबाई नामदेवराव पाटील, रवींद्र नामदेव पाटील, ज्योतीबाई रवींद्र पाटील या तिघांना शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच घरातील कुलरसह अंगणात उभ्या असलेल्या स्कूटीचेही नुकसान केले.

विशाल व वृषभ या दोघा पुतण्यांचा सांभाळ रवींद्र पाटील यांनी केला आहे. वडिलोपार्जित राहते घरही त्यांना राहावयास दिले आहे. केवळ पोटापुरते कष्ट करून त्यांना चरितार्थ चालवायचा आहे. मात्र नको ते उद्योग करीत हे दोघे धिंगाणा घालत असल्याने आजी विमलबाई यांनी त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार केली होती. त्या तक्रारीचा राग मनात ठेवून या दोघांनी मित्रांच्या मदतीने आजीसह काका-काकूला मारहाण केली.

रवींद्र पाटील यांच्या फिर्यादीची दखल घेत मंगळवारी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास देवपूर पोलिसांनी विशाल पाटील, वृषभ पाटील या दोघांसह सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक लोकेश पवार करीत आहेत. घटनेनंतर सर्व संशयित फरार झाले आहेत. पोलीस त्यांच्या मागावर आहेत.

Web Title: Anger over reporting to police, beating of uncle and aunt along with grandmother