माल उतरविण्यासाठी वेगळा वेळ द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:34 IST2021-05-17T04:34:24+5:302021-05-17T04:34:24+5:30

धुळे : दुकाने सुरू ठेवण्याच्या वेळेव्यतिरिक्त माल उतरविण्यासाठी वेगळा वेळ निश्चित करून द्यावा, अशी मागणी किराणा दुकानदारांनी केली आहे. ...

Allow separate time for unloading | माल उतरविण्यासाठी वेगळा वेळ द्यावा

माल उतरविण्यासाठी वेगळा वेळ द्यावा

धुळे : दुकाने सुरू ठेवण्याच्या वेळेव्यतिरिक्त माल उतरविण्यासाठी वेगळा वेळ निश्चित करून द्यावा, अशी मागणी किराणा दुकानदारांनी केली आहे. याबाबत असोसिएशन ऑफ बिझनेस ॲण्ड काॅमर्सने जिल्हा प्रशासनाला बुधवारी निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, कोरोना संसर्गामध्ये किराणा दुकानदार जीव धोक्यात घालून जीवनावश्यक वस्तूंची सेवा देत आहेत. किराणा दुकानदारांसाठी सकाळी ७ ते ११ या वेळेत व्यवसायाला परवानगी दिली आहे. परंतु या वेळेत मालाची लोडिंग करणे, ग्राहक करणे, मालाची अनलोडिंग करणे ही सर्व कामे पूर्ण करता येत नाहीत. एकाच वेळेत सर्व कामे करावयाची असल्याने बाजारात मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. याच वेळेत ग्राहकदेखील बाजारात येत असल्याने तारांबळ उडते. गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आहे. यावर उपाय म्हणून सकाळी ७ ते ११ या वेळेत ग्राहक आणि त्यांच्या मालाची लोडिंग करणे आणि बाहेरगावाहून येणाऱ्या मालाची अनलोडिंग करण्यासाठी दुपारी १२ ते ३ ही वेळ द्यावी. या वेळेत केवळ माल उतरविण्याचे काम व्यापारी करतील. असे केल्यास गर्दीवर नियंत्रण येईल. माल उतरविण्यासाठी दुपारचा वेगळा वेळ द्यावा, अशी मागणी निवेदनात केली आहे.

Web Title: Allow separate time for unloading