शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सोनगीर येथील टोलनाक्यावर दिवसभर शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 12:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सोनगीर : मुबंई-आग्रा महामार्गावर दिवसभर हजारो वाहनांची ये-जा सुरू असते. मात्र रविवारी जनता कर्फ्यू असल्याने या ...

लोकमत न्यूज नेटवर्कसोनगीर : मुबंई-आग्रा महामार्गावर दिवसभर हजारो वाहनांची ये-जा सुरू असते. मात्र रविवारी जनता कर्फ्यू असल्याने या टोलनाक्यावर शुकशुकाट दिसून आला. दिवसातून वाहनांची ये-जा अगदी नगण्य असल्याचे दिसून आले.कोरोना या विषाणूचा प्राधुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचे आवाहन केले होते. त्याला सोनगीरवासियांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला होता. ग्रामस्थांनीसकाळी सात वाजल्यापासून गजबजणारी ठिकाणी नागरिकविना ओस पडलेली दिसून आली. गावातील मुख्य बाजारपेठ,भाजी बाजार,कासार गल्ली, बस थांबे आदी महत्वाच्या ठिकाणी कडकडीत बंद पाळून जनता कफ्यूर्ला ग्रामस्थांनी प्रतिसाद दिलायेथील नेहमी दर्शनासाठी गर्दी असलेली विविध धर्माची धार्मिक स्थळे रविवारी ओस पडलेली दिसून आली. तर काही मंदिर आज सकाळ पासूनच बंद ठेवण्यात आली होती.मंदिर बंद राहणार असल्याचे सूचना यापूर्वीच देण्यात आलेली होती. बसस्थानक परिसरातही शुकशुकाट होता.मुंबई आग्रा महामार्गावरील सोनगीर फाटा देखील गेल्या दोन दिवसा दिवसा पासून बंद करण्यात आला असल्याने येथे देखील शुकशुकाट दिसून आला. तर महामार्गावर देखील वाहनांची वाहतूक मोजकीच असल्याने सर्वत्र शुळशुकाट बघायला मिळाला. या बंद काळात येथील ग्रामपंचयात सोबत पोलीस प्रशासनाची देखील महत्वपूर्ण भूमिका पार पडली. शनिवारी रात्रीच पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्ष प्रकाश पाटील यांनी दैनंदिन व्यवहार व दुकाने बंद ठेवण्याचे आव्हान ग्रामस्थांना केले होते. तरी रविवारी सकाळ पासून पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस कर्मचारी विशाल सोनवणे, शिरीष भदाणे,शामराव अहिरे, अजय सोनवणे यांचा सह आदी पोलिसांच्या पथकाने गावात पेट्रोलियम करत ग्रामाथाना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करत लोकांना एका ठिकाणी जमा होऊन नये व कुठल्याही अफवेवर विश्वास न ठेवता आपली काळजी घेण्याचे आव्हान करीत होते.

टॅग्स :Dhuleधुळे