शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

तब्बल साडेतीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर लागला तळघराचा सुगावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 22:46 IST

९ लाखांचा भांग जप्त प्रकरण : जमिनीवर काठी ठोकल्याने लागला तळघराचा तपास

लोकमत क्राईम स्टोरी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : बिलाडी रोडवरील एका शेतात तळघर करुन त्यात भांग लपवून ठेवल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली ८ कर्मचाºयांच्या पथकाने जमिनीतील तळघर शोधण्यासाठी काठीचा आधार घेऊन तब्बल साडेतीन तास मेहनत घेतली आणि काम मार्गी लावले़ गेल्या वर्षापासून गांजा आणि भांग यांच्या कारवाई मागच्या वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक झाल्या आहेत़ भांग, गांजा कुठून येतो, कुठे जातो याच्या मागावर धुळे पोलीस दल होते़ यासंदर्भात पोलिसांना शोध घेऊन तपास लावण्याच्या सूचना यापुर्वीच देण्यात आल्या होत्या़ त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेला भांग लपवून ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाली होती़ त्यानुसार, बिलाडी रोडवरील त्या शेतात भांग लपवून ठेवल्याचे सांगितल्यानंतर पहिल्यांदा शोध घेण्यात आला होता़ त्यात यश मिळाले नाही़ त्यानंतर पुन्हा शोध कामाला सुरुवात करण्यात आली़ बिलाडी रोडवरील एका शेतात कुंपन करण्यात आले़ ही जागा सुमारे ७ एकर इतकी आहे़ या जागेत कुठेतरी तळघर असून त्यात भांगचे पोते असल्याची माहिती अधिकृत असल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्या तळघराच्या शोध कामाला सुुरुवात केली़ शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास या कामाला प्रारंभ करण्यात आला़ जमिनीवर काठीने ठिकठिकाणी टोचण्यात येत होते़ तर काही ठिकाणी पाय देखील आपटण्यात येत होते़ त्याद्वारे जमिनीचा काही भाग भुसभुशीत आहे का, याची पडताळणी केली जात होती़ जागा मोठी असल्याने आणि नेमके ठिकाण माहित नसल्याने तळघराचा शोध लावण्यात उशिर होत होता़ दुपारी अडीच वाजेच्या सुमारास कुंपनामधील एका बाजुला काहीतरी खोलगट असल्याचा भास जाणवला़ क्षणाचाही विलंब न करता पोलिसांनी काही मजुरांची मदत घेऊन माती बाजुला सारण्यास सुरुवात केली़ अवघ्या अर्धा फुटावर लोखंडी झाकण असल्याचे आढळून आले़ झाकण उचकविल्यानंतर ७ ते ८ फुट खोल आणि अंदाजे २० बाय १५ अशी खोली सापडली़ त्या खोलीत शिडीचा आधार घेऊन तपासणी केल्यानंतर त्यात  ९ लाख २० हजार ८०० रुपये किंमतीच्या १८० कोरड्या भांगच्या गोण्या आढळून आल्याने पोलिसांची शोध मोहिम संपली़ 

वर्षभराची स्थितीसन २०१८ मध्ये गांजा आणि भांग प्रकरणी ९ गुन्हे जिल्ह्यात दाखल झाले आहेत़ त्यात ११ आरोपींचा समावेश आहे़ त्यांच्याकडून १ कोटी २६ लाख ६४ हजार ४९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़फेब्रुवारी २०१९ अखेर गांजा आणि भांग प्रकरणी ४ गुन्हे जिल्ह्यात दाखल झाले आहेत़ त्यात ६ आरोपींचा समावेश आहे़ त्यांच्याकडून १९ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला़ एनडीपीएसनुसार कारवाई़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी