खून प्रकरणातील आरोपी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 10:32 PM2021-04-05T22:32:26+5:302021-04-05T22:32:57+5:30

धुळे : तांत्रिक विश्लेषण ठरले महत्वपूर्ण

Accused in murder case arrested | खून प्रकरणातील आरोपी अटकेत

खून प्रकरणातील आरोपी अटकेत

Next

धुळे : काँग्रेस भवनाच्या परिसरात धारदार हत्याराने मारुन गंभीर जखमी अवस्थेत सापडलेल्या विशाल गरुड या इसमाचा मृत्यू झाल्यानंतर खुनाचा गुन्हा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला. गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण, परिस्थितीजन्य पुरावे, गोपनीय माहितीच्या आधारे ७२ तासात संशयिताच्या मुसक्या शहादा येथून आवळण्यात शहर पोलिसांच्या पथकाला यश आल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपअधीक्षक दिनकर पिंगळे, शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, अन्य अधिकारी व पथकातील कर्मचारी उपस्थित होते.

शुक्रवारी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास शहरातील काँग्रेस भवनच्या रोडवर विशाल माणिक गरुड (४३, रा. आंबेडकर चौक, अमरनगर, मनोहर टॉकीजच्या मागे, धुळे) याला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तीक्ष्ण व धारदार हत्याराने पोटात मारल्याने विशाल हा गंभीर अवस्थेत आढळला होता. दवाखान्यात त्याचा मृत्यू झाल्यानंतर भाचाच्या फिर्यादीवरुन खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. विशाल हा उपचारासाठी दाखल होण्याआधी मयत झाल्याने घटनेबाबत कुणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदारही नव्हता. गुन्हा हा अपरात्री घडल्याने गुन्ह्यातील आरोपीबाबत काहीही एक धागेदोरे उपलब्ध नव्हते. असा क्लिष्ट व किचकट गुन्हा उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. त्यानंतर गुन्ह्यांचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. परिस्थितीजन्य पुरावे गोळा करण्यात आले. गोपनीय माहितीचा आधार घेण्यात आला. त्यावरुन साक्री रोडवरील मोगलाईमधील जामा मशीदसमोर राहणारा शाकीर खान शकील खान पठाण (२५) हा असल्याचे प्राथमिक माहितीवरुन समोर आले. तो शहादा येथे लपला असल्याची माहिती समोर आली. माहिती मिळताच रविवारी मध्यरात्रीच त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपअधीक्षक दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्त्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक दादासाहेब पाटील, श्रीकांत पाटील, संतोष तिगोटे, उपनिरीक्षक समाधान गायकवाड, संगणक तज्ज्ञ व्रजेश गुजराथी, संजय पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक नाना आखाडे, पोलीस कर्मचारी भिकाजी पाटील, सतीश कोठावदे, राहुल पाटील, मुक्तार मन्सुरी, संदीप पाटील, योगेश चव्हाण, पंकज खैरमोडे, प्रल्हाद वाघ, अविनाश कराड, प्रसाद वाघ, राहुल गिरी, कमलेश सूर्यवंशी, विवेक साळुंखे, मनीष सोनगिरे, प्रवीण पाटील, नीलेश पोतदार, तुषार मोरे, शेखर वाडेकर, प्रदीप धिवरे यांनी परिश्रम करुन संशयिताच्या मुसक्या आवळल्या.

Web Title: Accused in murder case arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे