शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

सोनगीरजवळील अपघात, दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 12:01 IST

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग : वाघाडी गावात व्यक्त झाली हळहळ

सोनगीर - मुंबई आग्रा महामार्गावर मंगळवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास दुचाकीचा अपघात होऊन त्यात एकाचा जागीच मृत्यू झाला़ या प्रकरणी सोनगीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आहे. वाघाडी  (त़ शिंदखेडा) येथील खाजगी  वैद्यकीय व्यवसाय करीत असलेले संदीप अरविंद पाटील हे आपल्या ताब्यातील दुजाकी मोटारसायकल क्रमांक एमएच १४ डीझेड ५१०५ ने धुळ्याकडे शाळेतील कागद पत्र घेण्यासाठी जात असताना महामार्गावरील हॉटेल पंकजच्या जवळ मागून भरधाव वेगाने  येणाºया एका अज्ञात वाहनाने धडक दिली़ यात संदीप हे जागीच मृत झाले़ अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच सोनगीर टोल प्लाझाचे डॉ़ भूषण जाधव, प्रशांत गवळे, विनोद पिसे, सुमीत शिंदे, मोहसीन शेख यांनी धाव घेत मदत कार्य केले़ त्या पाठोपाठ सोनगीर पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले होते़ संदीप पाटील यांना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले़ पंडित यशवंत पाटील यांनी सोनगीर पोलिसात माहिती दिली़ त्यानुसार नोंद घेण्यात आली़ संदीप पाटील यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेAccidentअपघात