धुळ्यात रुग्णवाहिका, लक्झरी यांच्यात अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 12:37 IST2018-04-21T12:37:25+5:302018-04-21T12:37:25+5:30
पहाटेची घटना : सुदैवाने जीवितहानी टळली, १ जखमी

धुळ्यात रुग्णवाहिका, लक्झरी यांच्यात अपघात
ठळक मुद्देकराचीवाला खुंट भागातील घटनालक्झरी आणि रुग्णवाहिका यांच्यात झाला अपघातसुदैवाने जीवितहानी टळली
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील कराचीवाला खुंट चौकात लक्झरी आणि रुग्णवाहिका यांच्यात अपघात झाला़ ही घटना शनिवारी पहाटे घडली़ यात १ जण किरकोळ जखमी झाला असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही़
राजकमल नावाची लक्झरी आणि एमएच १८ एए ८०१ क्रमांकाची रुग्णवाहिका यांच्यात धडक झाली़ दोनही वाहने वेगात असताना ही दुर्घटना घडली़ पहाटेच्यावेळेस गस्तीवर असलेल्या पोलिसांना ही बाब लक्षात आली़ या अपघातात रुग्णवाहिका रस्त्याच्या बाजुला फेकल्याने पलटी झाली होती़ यात एक जण किरकोळ जखमी झाला़ सुदैवाने जीवितहानी झालेली नाही़