शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ९६.७० टक्के रुग्णांची कोरोनावर मात, केवळ ०.६६ टक्के ॲक्टिव्ह रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:43 IST

धुळे - जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी ९६.७० टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांची प्रकृती ठणठणीत झाली आहे. शिंदखेडा ...

धुळे - जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी ९६.७० टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांची प्रकृती ठणठणीत झाली आहे. शिंदखेडा तालुक्यातील बाधित रुग्णांपैकी ९७.३८ टक्के रुग्णांनी कोरोनावर विजय मिळवला आहे. जिल्ह्यातील सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १ टक्क्यांपेक्षाही कमी झाली आहे. ०.६६ टक्के रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. मृत्यूदर मात्र दोन टक्क्यांपेक्षा अधिक आहे. आतापर्यंत आढळलेल्या एकूण बाधित रुग्णांपैकी २.६३ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील १४ हजार ८४७ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी ३९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर १४ हजार ३५८ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ९८ बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

कोरोनामुक्तीत शिंदखेड्याची आघाडी -

कोरोनामुक्त रुग्णांच्या प्रमाणात शिंदखेड्याने आघाडी घेतली आहे. शिंदखेडा तालुक्यातील ९७. ३८ टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तालुक्यातील १ हजार ८३७ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यापैकी १ हजार ७८९ रुग्ण बरे झाले आहेत. ४५ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या ३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

धुळे शहरात ५९ रुग्ण -

जिल्ह्यातील एकूण ९८ बाधित रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. त्यापैकी ५९ रुग्ण हे धुळे शहरातील आहेत. धुळे शहरात एकूण ७ हजार १२२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. ६ हजार ८८९ रुग्ण बरे झाले असून १७४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

साक्रीतील ९७ टक्के रुग्ण बरे -

साक्री तालुक्यातील ९७. ३० टक्के रुग्ण बरे झाले आहेत. तालुक्यात आढळलेल्या १ हजार ४११ रुग्णांपैकी १ हजार ३७३ रुग्ण बरे झाले आहेत. ३१ रुग्णांचा मृत्यू झाला असून ७ जणांवर सध्या उपचार सुरु आहेत. तालुक्यातील सक्रिय रुग्णांची संख्या शून्य झाली होती. मात्र त्यानंतर पुन्हा ७ बाधित रुग्ण आढळले आहेत.

धुळे तालुक्यात २० सक्रिय रुग्ण -

धुळे तालुक्याचे कोरोनामुक्तीचे प्रमाण इतर तालुक्यांच्या तुलनेत कमी आहे. तालुक्यातील ९४.५८ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तालुक्यात १ हजार ७३६ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यापैकी १ हजार ६४२ रुग्ण बरे झाले आहेत. ७४ रुग्णांचा मृत्यू तर २० रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.

शिरपुरात ९ रुग्ण -

शिरपूर तालुक्यातील ९ बाधितांवर सध्या उपचार सुरु आहेत. तालुक्यात एकूण २ हजार ७४१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी २ हजार ६६५ बरे झाले आहेत. तालुक्याचे कोरोनामुक्तीचे प्रमाण ९७.२२ टक्के इतके आहे. ७६ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.